
सातारा प्रतिनिधी
सातारा तालुक्यात वेगळ्या ठिकाणाहून चोरीस गेलेल्या चार मोटरसायकली पोलिसांनी जप्त केले आहेत.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना एका गुप्त माहितीच्या आधारे सातारा तालुका पोलीस ठाण्याचे डीबी पथकास मौजे लिंब या ठिकाणी तीन इसमांना मोटरसायकल सह ताब्यात घेतले त्यांच्याकडे कसोशीने चौकशी केली असता सदर रिस्पॉन्स चार दुचाकी चोरी केल्याचे कबुली दिल्याने त्यांना अटक करण्यात आली. दुचाकींची किंमत 1,10,000/ रुपये आहे.
सातारा तालुका पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे साहा पोलीस निरीक्षक विनोद नेवसे दादा स्वामी, शिखरे, गायकवाड, प्रदीप मोहिते, संदीप पांडव, पोलीस कॉन्स्टेबल धिरज पारडे यांनी महत्वाची भूमिका बजावली.
सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख, वैशाली कडूकर अपर पोलीस अधीक्षक सातारा, पोलीस उपविभागीय अधिकारी राजीव नवले यांनी सर्वांचे कौतुक अभिनंदन केले.