
नगर प्रतिनिधी
एमआयडीसी पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या दहा जणांच्या टोळीला ताब्यात घेतले आहे. या टोळीकडून ३ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. १७ मार्च रोजी १०.३० च्या सुमारास, सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना एक गुप्त माहिती मिळाली होती.
त्यानुसार, नगर मनमाड महामार्गावरील वेळ परिसरातील चौधरी हॉटेल समोर अंधारात काही तरुण मोटरसायकलवर हत्यारांसह थांबले होते.
ही माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता विळद घाट परिसरातील तळ्याच्या कडेला काही मोटरसायकल उभ्या करुन रोडवरील पत्र्याचे दुकानाचे मागील बाजुस काही इसम दबा धरुन बसल्याचे पोलीसांना दिसले. पोलिसांनी त्यांना विचारपूस करण्यास सुरुवात करताच त्यांच्यातील दोन जण आंध्राचा फायदा घेऊन पळून जात असताना पोलिसांनी त्यांना पाठलाग करून पकडले व इतर आठ जणांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेले संशयित इसम १) मयुर पोपट बोरुडे वय २४ वर्षे रा. आठरे पाटील स्कुल जवळ शेवाळे मळा अ.नगर २) संकेत विजय वारस्कर वय २४ वर्षे रा. सिद्धार्थ नगर अ.नगर ३) ऋतिक रमेश शिंदे वय २४ वर्षे रा. सिद्धार्थ नगर अ.नगर ४) संतोष राम घोडके वय २४ वर्ष रा. सिद्धार्थनगर अ.नगर ५) अनिल वसंत घोरपडे वय २६ वर्षे रा. भुतकरवाडी अ.नगर ६) अनिकेत अनिल गायकवाड रा. सिद्धार्थनगर अ.नगर ७) ऋषिकेश राजु पाटोळे वय २५ वर्षे रा. सिध्दार्थनगर अ.नगर ८) शिवम अनिल झेंडे वय २४ वर्षे रा. सिद्धार्थनगर अ.नगर ९) अजय राजेश गायकवाड वय २२ वर्षे रा. भुतकरवाडी अ.नगर १०) रोहित वाळु अटक वय २४ वर्षे रा. सिद्धार्थनगर अ.नगर असे असून त्यांच्याकडून लोखंडी कोयता, लोखंडी पाईप, लोखंडी कुऱ्हाड, दोरी, मिरची पुड, लाकडी दांडके चार मोटारसायकली ९ मोबाईल असा एकुण ३,३५०००/- रुपयाचा मुददेमाल मिळुन आला असून हे सर्वजण कुठेतरी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी सापळा रसून आरोपींना अटक केली आहे.