
पत्रकार:उमेश गायगवळे
वांद्रे पश्चिम येथील कांचन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या ज्येष्ठ महिलेच्या घरात एका अज्ञात इसमाने चोरीच्या उद्देशाने घरात घुसून 64 वर्षीय जेष्ठ महिलेची निर्गुण हत्या केली वांद्रे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अवघ्या दोन तासात आरोपीच्या मुसक्याआवळ्या आहेत.
ही घटना 5 फेब्रुवारी च्या मध्यरात्री साडे अकराच्या दरम्यान घडली अज्ञात इसमाने घरात घुसून महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला केला या हल्ल्यात महिलेच्या डोक्यावर आणि शरीरावर गंभीर दुखापत झाली आणि आरोपीने घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळाला.
पिडितेच्या मुलीने दाखल केलेला तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला तांत्रिक पुराव्याच्या आधारे 27 वर्षेय संशयिताला अटक केली. त्याची ओळख अली समशेर अली शेख अशी झाली. चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यामुळे त्याला तात्काळ अटक करण्यात आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मराठे निरीक्षक बालाजी भांगे आणि गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पीएसआय विजय आचरेकर आणि पीएसआय बजरंग जगताप यांनी सांताक्रुज व आंबोली पोलिसांच्या पथकणी आरोपीचा शोध घेऊन आरोपीला अटक केली.