
मुंबई प्रतिनिधी
पालघर पोलिसांनी शनिवारी बोईसर येथील एका निवासी फ्लॅटमधून २.४२ कोटी रुपयांचे १.२ किलो मेफेड्रोन (एमडी) जप्त केले. या फ्लॅटचा वापर औषध निर्मिती युनिट म्हणून केला जात होता.
गुप्त माहितीच्या आधारे, बोईसर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने शनिवारी पहाटे 2 च्या सुमारास फ्लॅट क्रमांक 103, इमारत क्रमांक 17, कलर सिटी, काटकर पाडा येथे छापा टाकला. त्यांनी 1,208 ग्रॅम एमडी, कच्चा माल आणि उत्पादन उपकरणे जप्त केली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अमन नईम मुराद (२९, रा. हकीम मोहल्ला,( वसई), असून त्याच्यावर अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायदा १९८५ च्या अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला ११ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अंमली पदार्थाच्या कारवाईत सहभागी असलेल्या आणखी चार संशयितांचा पोलिस कसून शोध घेत आहेत.