
सातारा प्रतिनिधी
सातारा- लोणंद महामार्गावर देऊर (ता. कोरेगाव) येथील दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू झाला. सचिन भानुदास अहिरे (वय ३५, रा. हिंगणगाव, ता. फलटण) असे मृताचे नाव आहे. ते मुंबई पोलिस दलामध्ये कार्यरत होते.
घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन अहिरे हे मुंबई पोलिस दलामध्ये काम करत असून, ते रजा घेऊन गावी आले होते. साेमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्याचा मित्र प्रफुल्ल खलाटे (रा. खुंटे, ता. फलटण) असे दोघे दुचाकी (एमएच ११ सीई ६२३८) वरून सातारा दिशेने जात होते. बिचुकले फाटा येथे पुढे चाललेल्या दुचाकीला धडक दिली.
यात दोघे रस्त्यावर पडले. दरम्यान, सातारा बाजूकडून येणारा डंपर अहिरे
यांच्या अंगावरून गेला. यात ते गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच वाठार पोलिस व स्थानिकांना वाठार स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखले. त्यानंतर पुढील उपचाराकरता सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, तर प्रफुल्ल खलाटे यास फलटण येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.