पुणे (विभागीय प्रतिनिधी,सुनील कलशेट्टी
पुणे (दिनांक २४ जानेवारी २०२५)–राज्यातील रुग्णसंख्या ६७ वर १३ व्हेंटिलेटर वर, २४ जणांवर अति दक्षता विभागात उपचार सुरू आहे. त्यात ४३ पुरुष आणि २४ महिला आहेत.
पुण्यात आढळले रुग्ण हे प्रामुख्याने सिंहगड रोड परिसरातील नांदेड गाव, किरकटवाडी आणि धायरी भागात या आजाराचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे त्यांच्या पिण्याचा पाण्याचा स्तोत्र एकच होता का, यांचा शोध आरोग्य विभागाकडून घेतला जात आहे . यावेळी त्यांची एकाच परिसरात खाद्यपदार्थ खाल्ले होते का, याचाही शोध घेण्यात येत आहे काही रुग्णांच्या तपासणीत कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी हा जिवाणू संसर्ग समोर आला आहे. या जेवणाचा संसर्ग हा प्रामुख्याने दूषित पाणी अथवा अन्नातून होतो. हा संसर्ग झाल्यानंतर अतिसार, पोटदुखीचे लक्षणे दिसून येतात काही रुग्णांमध्ये त्यांची प्रतिकारशक्ती जिवाणू ऐवजी शरीरातील चेतासंस्थेवर हल्ला करते. हे रुग्ण १ ते ३ बरे होतात.
बहुतांश रुग्ण हे पुणे परिसरातील आहेत. पुणे ग्रामीण मध्ये आत्तापर्यंत ३९ रुग्ण आढळले आहेत. तर महानगरपालिका हद्दीत १३ तर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत १२ रुग्ण आढळले आहेत. तर ०३ रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. यामुळे पुण्यातील रुग्णसंख्या ६४ वर पोहोचलेत ही वाढती संख्या लक्षात घेता. पिंपरी चिंचवड व पुणे महापालिकेसह जिल्हा प्रशासनाने बाधित भागात तातडीने रुग्ण सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे. या सर्वेक्षणांतर्गत गुईलेन बॅरी सिड्रोमची लक्षणे दिसणार रुग्णांचा शोध घेतला जात आहे. आरोग्य विभागाने या प्रकरणी शीघ्र प्रतिसाद पथक स्थापन केले आहे. या पथकाच्या माध्यमातून रुग्णसंख्या अधिक असलेल्या भागाची पाहण केली जात आहे. संशयित रुग्णाचे शौचनमुने नमुने व रक्त नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत पाठवण्यात येत आहेत. काहींच पाठवण्यातही आले आहेत याशिवाय पुण्यातील विविध भागातील पाण्याचे नमुने रासायनिक व जैविक तपासणीसाठी राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आलेत.
पुणे महापालिका आयुक्तांकडून पाहणी
या पार्श्वभूमीवर बुधवारी महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांच्याकडून नांदेड गावात पाहणी करण्यात आली येथे असलेल्या विहिरीत शेवाळे चढलंय, याच विहिरीतून गावात पाणीपुरवठा केल जात असतो. पुणे महापालिका या विहिरीबाबत या आजाराबाबत काय उपयोजना करणे गरजेचे असणार आहे. यावेळी महापालिका आयुक्त यांनी नवीन समाविष्ट गावातील विहिरी, पाण्याच्या टाक्या व GBS आजाराने बाधित भागाची व आजाराने बाधित नागरिकांची त्यांचे घरी जाऊन, ऍडमिट असलेल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेऊन पाहणी आणि चौकशी केली. आयुक्तांनी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश सूचना संबंधित सर्व मनपा विभागास व नवीन समाविष्ट गावाचे अंतर्गत नियंत्रित ग्रामीण जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांस देण्यात आले आहेत.
काळजी काय घ्यावी
१) पिण्याचे पाणी आधी उकळा नंतर प्या
२) भाज्या आणि फळे स्वच्छ धुतल्या शिवाय खाऊ नका
३) चिकन आणि मांस व्यवस्थित शिजवून खा
४) अंडी, माशांसह इतर पदार्थ कच्चे खाऊ नका
५) जेवणाआधी आणि स्वच्छतागृहाचा वापर केल्यानंतर साबणाने हात धुवा
६) खाण्याचे भांडे अथवा अन्नाची दुसऱ्याशी देवाण-घेवाण करू नका
७) कच्चे आणि शिजलेले अन्न वेग वेगळे ठेवा
८) स्वयंपाक घराचा उठा आणि भांडी निर्जंतुक करून घ्या
अशातच हा आजार कशामुळे होतो ? याबद्दल माहिती समोर आली आहे.गुईलेन बॅरी सिड्रोमची बाधा कॅम्पायलोबॅक्टर जेजुरी हा जिवाणू आणि नोरो व्हायरस या विषाणूमुळे झाल्याचे उघड झाले आहे. राष्ट्रीय विषय विज्ञान संस्थेने केलेल्या रुग्णाच्या नमुनाच्या तपासणी ते निष्पन्न झाले आहे.. दूषित अन्न व पाण्यातून हे जिवाणू आणि विषाणू पसरतात. पुण्यातील रुग्णांना बाधा यामुळे झाली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
गुईलेन बॅरी सिड्रोम पोस्ट वायरल आणि पोस्ट बॅक्टेरियल आजार आहे. हा आजार १९१६ पासून आढळतो. भारतातच नाही तर जगात सर्वत्र आढळतो. दुर्मिळ आजार असला तरीही धोकादायक आजार नाही. स्नायू दुखणे, गुडघे दुखणे, या आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत. शिवाय दूषित पाण्यामुळे ही हा आजार होऊ शकतो. त्यामुळे पाणी गरम करून पिणे आणि उघड्यावरचा न खाणे असा सल्ला सह्याद्री हॉस्पिटलच्या डॉ आराधना चव्हाण यांनी दिला आहे.


