
पुणे (विभागीय प्रतिनिधी,सुनील कलशेट्टी
पुणे (दिनांक २५ जानेवारी २०२५)—न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे आज दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी छत्रपती संभाजी नगर मध्ये निधन झाले. ते ८६ वर्षाचे होते.
न्या. नरेंद्र चपळगावकर यांचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील चपळगांव हे होते. मात्र, त्यांचे कुटुंबातील अनेक पिढ्या बीड जिल्ह्यात स्थानिक होते. त्यामुळे चपळगावकर हे मूळचे बीडचे असल्याचे मानले जाते. न्या नरेंद्र चपळगावकर यांचा जन्म १४ जुलै १९३८ रोजी बीड जिल्ह्यात झाला होता. आणि त्यांचे वडील पुरुषोत्तम चपळगावकर देखील वकील होते. त्यांच्या कुटुंबातील काही व्यक्ती हैदराबाद संस्थानाच्या सरकारी नोकरी देखील होते. त्यामुळे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचे संस्कार त्यांच्यावर घरातूनच झाले होते.
स्वातंत्र्य चळवळीत ही त्यांच्या घराण्याचे योगदान होते
त्यांचे वडील पुरुषोत्तम चपळगावकर यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात देखील हिरहिरीने सहभाग घेतला होता. त्यामुळे त्यांना अनेक वेळा कारावासही भोगाव लागला. त्यांच्या या राजकीय आणि स्वातंत्र्य चळवळीतील सहभागामुळे चपळगावकर कुटुंबांचा अनेक नेत्याशी संबंध आला. या नेत्यांमध्ये अनंत भालेराव व राष्ट्रसेवा दलाचे संस्कार आणि अशा महान नेत्यांचा जवळचा सहवास लाभल्याने त्यांचे संस्कार देखील नरेंद्र यांच्यावर झाले.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राहिल्याने समाजातील घडामोडीचा समतोल आणि चिकित्सक अभ्यास करण्याचे कसब त्यांच्याकडे होतं. वैचारिक निष्ठा आणि बांधिलकी जपत राजकीय, सामाजिक विषयावर स्पष्ट भूमिका घेणारे साहित्यातून आपली भूमिका ठामपणे मांडणारे लेखक म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. सामाजिक सांस्कृतिक इतिहासाचा त्यांचा गाढ अभ्यास होता. त्यांनी लिहिलेली पुस्तकं आणि लेखांमध्ये त्यांच्यातला विचारवंत ठळकपणे दिसतो. त्यांनी लिहिलेलं “गांधी आणि संविधान” पुस्तक संविधान आणि गांधी विचाराचे अलौकिक दर्शन घडवणारे आहे.
न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी पत्रकारिता, वकिली, न्यायदान, अध्यापन ते लेखनाच्या क्षेत्रात भरीव काम केले यांच्या निधनामुळे एक कृतिशील विचारवंत हरपला आहे.