
पुणे (विभागीय प्रतिनिधी,कलशेट्टी
पुणे (पिंपरी चिंचवड,मोरवाडी दि.१८ जानेवारी २०२५)–पर्पल जल्लोष महाउत्सवाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न. दिव्यांग बांधव हा समाजाचा अविभाज्य घटक असून दिव्यांगाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्यांच्या
पंखांना बळ देण्याचे काम शासन करेल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
राज्यात ६५ लाख अपंग असून दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने माजी सैनिकांना मालमत्ता करामध्ये सवलत दिले जाते त्याप्रमाणे अपंग नाही आता मालमत्ता करात ५०% सवलत दिली जाईल. याबाबतचा प्रस्ताव महापालिकेने रा शासनाकडे पाठवावा. त्याला मंत्रिमंडळाची मान्य देण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिले आहे. महापालिकेच्या दिव्यांग भवन फाउंडेशनच्या वतीने पिंपरी चिंचवड (मोरवाडी) येथे दिनांक १७ ते १९ जानेवारी २०२५ या कालावधीत मोरवाडी येथील ऑटो कलस्टर मैदानावर ” पर्पल जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला उमा खापरे, आ. अण्णा बनसोडे, आ. अमित गोरखे, केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचे सचिव राजेश अग्रवाल, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले, पी एम आर डी ए आयुक्त योगेश म्हसे, दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी, पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, दिव्यांग भवन फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख उपस्थित होते
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, दिव्यांग बांधवांसाठीच्या योजना राबविण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ठराविक निधी हा दिव्यांगासाठी खर्च करण्याबाबतचा निर्णय शासन पातळीवर घेण्यात येईल. यासंबंधीचे आदेश देखील आदेश लवकर काढले जातील. राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये दिव्यांगाच्या विविध योजनांसाठी तरतूद केली जाईल यासाठी जिल्ह्यानुसार दिव्यांगांचा आढावा घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे . पिंपरी चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयात दव्यांगणा प्रमाणपत्र दिले जात आहे त्याच धर्तीवर ससून रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालयात देखील दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यात येईल यासाठी आवश्यक किती निर्देश देण्यात येतील अशी माहिती श्री अजित पवार यांनी दिली.
अपंग फेरीवाल्यांवर कारवाई नको••••••••
‘अतिक्रमण कारवाई करत असताना विशेष बाब म्हणून अपंग फेरीवाल्यांवर पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका आणि पीएमआरडीए प्रशासनाने कारवाई करू नये, त्यांच्या उपजीविकेचे साधन काढण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांना मोकळी जागा द्यावी. अपंगांनीही शहराला बकालपणा येईल, अशा पद्धतीने कुठेही स्टॉल उभारू नयेत असे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.