पुणे अवैद्यरित्या नायलॉन मांजाच्या विक्री करणाऱ्यांवर सिंहगड पोलिसांनी टाकला छापा.
सातारा प्रतिनिधि
January 13, 2025

पुणे (विभागीय प्रतिनिधी,सुनील कलशेट्टी
पुणे:सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैधरीत्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या इसमावर पोलिसांनी छापा टाकून ११ नायलॉन मांजा केले जप्त.
सदर बाबत अधिक माहिती अशी की दि. ११/०१/२०२५ रोजी तपास पथकातील पोलीस स्टाफ सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत असताना सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत करत मानाजी नगर नऱ्हे पुणे येथे संध्याकाळी ४. ३० वाजता सुमारास आलो असता पोलीस समजदार सागर शेंडगे व पोलीस आमदार अण्णा केकान यांना त्यांचे खास बातमी दारा मार्फत बातमी मिळाली की, सिद्धी क्लासिक बिल्डिंगच शेजारी व अमोल दांगट यांचे चाळीसमोर वडगाव बुद्रुक पुणे येथे एक इसम चोरून शासनाने प्रतिबंधित केलेल्या नायलॉन मांजाची त्यांच्या ओळखीच्या लोकांना विक्री करत आहे. अशी बातमी मिळाल्याने सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम यांना कळविले असता. त्यांनी सदरची बातमी मा वरिष्ठांना कळविल्याने मा वरिष्ठांनी बातमीची खात्री करून योग्य ती करावी करण्याचे आदेश दिल्याने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी ५.२५ वा (संध्याकाळी ) जाता सदर ठिकाणी एक असं उपस्थित होता. त्यास आमची व आमचे शेवटचे पोलीस स्टॉप ची पंचांची ओळख सांगून आमचे पोलीस आय कार्ड दाखवून इसमास त्यांचे नाव पत्ता विचारता त्याने आपले नाव पत्ता योगेश शत्रुघन शहा वय–२० वर्ष दांगट यांचे रूम मध्ये भाड्याने अमोल दांगट यांच्या घरासमोर, नेवसे हॉस्पिटल जवळ, वडगाव बुद्रुक पुणे. त्याची पंचायत समिती झेडपी घेतली असता, त्याच्या जवळ एका खाकी रंगाचे बॉक्समध्ये ६,५०० रुपये किमतीचे ११ नायलॉन म्हणजेच आढळून आले ते जप्त करून त्यांच्या विरुद्ध सिंहगड रोड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद केला, नंबर २४/२०२५ भा. न्याय संहिता २०२३ चे कलम २२३,१२५ तसेच पर्यावरण संरक्षण कायदा कलम १९८६ चे कलम ५,१५ अन्वये दाखल करण्यात आला असून पुढील अधिक तपास पोलीस हवालदार, संजय शिंदे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी श्री अमितेश कुमार सो, पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री रंजनकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त पुणे शहर, श्री प्रवीण कुमार पाटील सो अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री संभाजी कदम सो मा पोलीस उपायुक्त परिमंडळ–३ पुणे शहर, श्री अजय परमार सो सहाय्यक पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभाग पुणे शहर, श्री दिलीप दाईंगडे सो ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर, श्री उत्तम भजनावळे पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सचिन निकम, पोलीस उपनिरीक्षक श्री संतोष भांडवलकर, आबा उत्तेकर, पोलीस अंमलदार संजय शिंदे, अण्णा केकाण, उत्तम तारू, पंकज देशमुख देवा चव्हाण, अमोल पाटील, विकास पांडोळे, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर, स्वप्निल मगर, विनायक मोहिते, विकास बांदल, यांच्या पथकाने केली.