
सातारा प्रतिनिधी, न्युज नेटवर्क
सातारा परिसरात मोटरसायकली चोरण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असताना शाहूनगर पोलिसांनी याची गंभीर दखल असून साताऱ्यातून चोरी झालेल्या मोटरसायकली सांगली येथून तीन मोटरसायकली जप्त केल्या असून एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
सातारा शाहूनगर परिसरात मोटार सायकली चोरण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असताना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत सूचना केल्या असताना शाहूनगर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी या चोरीचा छडा लावण्यासाठी विशेष पथक स्थापन केले होते. अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे प प्रकटीकरण शाखेचे अधिकारीकुमार ढेरे, पोलीस अमलदार सुरेश घोडके, मनोज मदने, निलेश काटकर, ज्योतीराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे, संग्राम फडतरे, यांनी यशस्वी मोहीम राबवून आरोपीला सांगली येथून अटक करून तीन मोटरसायकली सुमारे किंमत १ लाख तीस हजार च्या मोटार सायकली जप्त केल्या.