
सातारा प्रतिनिधी न्यूज नेटवर्क
बंगळूर : यादगीर तालुक्यातील दुगनूर कॅम्पमध्ये थरकाप उडवणारी घटना घडली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत बापानं दोन चिमुकल्यांची विळ्यानं निर्घृण हत्या केली असून, हल्ल्यात तिसरा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शरणप्पा याने तीन वर्षांचा मुलगा भार्गव आणि पाच वर्षांची सानवी यांची हत्या केली. तर आठ वर्षांचा मुलगा हेमंत हा गंभीर जखमी असून त्याच्यावर यादगीर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेच्या वेळी आरोपीची पत्नी जयम्मा आणि त्याची आई घराबाहेर गेल्या होत्या. हत्या करून शरणप्पा फरार झाला आहे.
सुमारे दहा वर्षांपूर्वी शरणप्पा याचे जयम्माशी लग्न झाले होते. सुरुवातीला संसार सुरळीत होता. मात्र, शरणप्पा पत्नीवर नेहमीच चारित्र्याचा संशय घेत असे. ‘‘मुलं माझी नाहीत’’ अशा संशयामुळे तो वारंवार जयम्माला धमकावत असे. या कारणास्तव जयम्मा दोन वर्षांपूर्वी मुलांना घेऊन माहेरी गेली होती. पंचायतीनंतर पंधरा दिवसांपूर्वी दोघे पुन्हा एकत्र आले; पण या सलोख्याचा शेवट आज दुर्दैवी हत्याकांडात झाला.
या अमानुष घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी शरणप्पाच्या शोधासाठी पोलीस पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेत आहेत.