
मुंबई प्रतिनिधी
मुंबई : बेहरामपाडा, नौपाडा, गरीब नगर आणि बापूजी स्टॉल परिसरातील जागेची सखोल पुनर्मोजणी करण्यात यावी, अशी मागणी आमदार वरूण सरदेसाई यांनी मुंबई उपनगर जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
सदर जागेचा सध्या सर्वेक्षणाचा कामकाज सुरु असून या जागेच्या मालकीबाबत वाद कायम आहे. ७/१२ उताऱ्यावर पश्चिम रेल्वेचे नाव असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून पुनर्वसनाची प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सरदेसाई यांनी जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन तातडीने पुनर्मोजणी करून वास्तव स्थिती स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.