
मुंबई, सातारा प्रतिनिधी न्युज नेटवर्क
शिवसेना महिला आघाडीच्या वतीने वाळूंज यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. याबाबत वाळूंज यांच्या विरोधात तात्काळ कारवाई केली जाईल असे केडीएमसी सचिवांनी आश्वासन दिले आहे. दोन दिवसात कारवाई झाली नाही तर पुढे आम्ही काय करतो असा सज्जड इशारा शिवसेना महिला आघाडीने केडीएमसी प्रशासनाला देण्यात आला आहे.
आज शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केडीएमसी सचिव किशोर शेळके यांची भेट घेतली. महिला कर्मचारीचा विनयभंग करणाऱ्या अधिकाऱ्यावर तत्काळ कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन छडण्यात येईल असा इशारा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने देण्यात आला. यावेळी महिला कर्मचाऱ्यांकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या अधिकाऱ्यांचे डोळे काढू, असा इशारा देखील शिवसेना महिला आघाडीच्या वतीने देण्यात आलाय. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
कल्याणमधील शिवसेना पदाधकारी छाया वाघमारे, नितू कोटक आणि नेत्रा उगले यांच्या नेतृत्वात महिला शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज केडीएमसी सचिव किशोर शेळके यांची आज भेट घेतली. महिला शिवसेना शिष्टमंडळ केडीएमसी आयुक्तांना भेटण्यासाठी आले होते. आयुक्त इंदूराणी जाखड या बाहेर असल्याने शिष्टमंडळाने सचिव शेळके यांची भेट घेतली. केडीएमसीच्या ब प्रभागातील पाणी पुरवठा खात्यातील अधिकारी महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या अधिकाऱ्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महिला आघाडीने दिला आहे. केडीएमसीतील महिला कर्मचाऱ्यांनी घाबरण्याची अजिबात गरज नाही, शिवसेना महिला आघाडी खंभीरपणे उभी आहे, असे कोणी महिलांसोबत करत असेल तर त्या अधिकाऱ्याचे डोळे काढू, अधिकाऱ्याविरोधात कारवाई झाली नाही तर पुढे काय करु ते बघा, असा इशारा महिला आघाडीने दिला. सचिव शेळके यांनी संबंधित तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली आहे. अधिकाऱ्यावर करण्यात आलेले आरोप गंभीर आहेत. त्यांच्याविरोधात लवकर कारवाई केली जाईल असे सचिन शेळके यांनी सांगितले.