
मुंबई प्रतिनिधी
सिद्धार्थ कॉलनी हित संरक्षण हौसिंग सोसायटीचे माजी संचालक मंडळ सदस्य आणि आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते, तसेच सावरकर ग्रामस्थ मंडळ मुंबईचे अध्यक्ष दिवंगत जनार्दन भिकू तांबे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जलदान विधी व अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही अभिवादन सभा येत्या रविवार, दिनांक २२ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजता त्रिरत्न बुद्ध विहार, प्रज्ञा संस्कृती केंद्र, शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व), मुंबई – ५१ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात बौद्धाचार्य मा. प्र. जाधव गुरुजी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
स्व. तांबे यांचा जन्म ११ एप्रिल १९४८ रोजी झाला होता आणि त्यांचे निधन १४ जून २०२५ रोजी झाले. त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करताना, अनेक कार्यकर्ते, मित्र, आणि सहकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजन सावरकर ग्रामस्थ मंडळ मुंबई ग्रामीण आणि बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक १४५ (सिद्धार्थ कॉलनी), तसेच ‘विश फ्रेंड्स’ या सामाजिक संस्थेने केले आहे.
कार्यक्रमात सहभागी होऊन दिवंगत तांबे यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.