#satara#sataranews#marathinews Archives - Satara Pratinidhi

संगममाहुली येथील राजघाटाचे पुर्ननिर्माण करणार – मंत्री शिवेंद्रसिंहराजे.
सातारा:प्रतिनिधी

श्री.छ. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर करणाऱ्या, शाहूनगरी वसवणाऱ्या श्री.छ. शाहू महाराज (थोरले) यांचा इतिहास त्या मानाने दुर्लक्षित राहिला आहे. परंतु यापुढील काळात त्यांचा इतिहास, त्यांचे कार्य पुढील पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. संगममाहुली येथे राजघाटाचे पुर्ननिर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.

ते संगममाहुली येथे छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांच्या समाधीस मावळा फौंडेशन आणि विविध संस्थांनी आयोजित केलेल्या अभिवादन प्रसंगी बोलत होते. यावेळी मावळा फौंडेशनचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार हरिष पाटणे, जनता बँकेचे चेअरमन अमोल मोहिते, जनता बँकेचे सीईओ अनिल जठार, जिल्हा बँकेच्या संचालिका कांचनताई साळुंखे, कामेश कांबळे, रवींद्र झुटींग, राजुशेठ राजपुरोहित, अजय जाधवराव, संगममाहुलीचे सरपंच प्रवीण शिंदे, उपसरपंच अविनाश कोळपे, जयहिंद मंडळाचे अध्यक्ष प्रदीप वाघमळे, क्षेत्रमाहुली, सोनगाव ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना उपस्थितांच्यावतीने श्रध्दांजली वाहण्यात आली. मंत्री शिवेंद्रसिंहराजे पुढे म्हणाले, श्री.छ. शाहू महाराज (थोरले) यांनी शाहूनगरी वसवली तिला मराठ्यांची राजधानी केली परंतु त्यांच्या इतिहासाबाबत फारसे लिहिले नाही किंवा त्यांच्या कार्याबद्दल फारसे सांगितले गेले नाही. साताऱ्यात त्यांच्या आठवणी, स्मृतीच्या खुणा नाहीत ही दु:खद गोष्ट आहे परंतु यापुढे त्यांच्या कार्याबद्दल माहिती व्हावी यासाठी मावळा फौंडेशनच्या सहकार्याने प्रयत्न करणार आहे. लवकर नगरपालिकेच्या नूतन इमारतीच्या आवारात त्यांच्या पुतळा बसवण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. काळाच्या ओघात नदीचे पात्र बदलले असून याठिकाणी अनेक गोष्टी बदलल्या आहेत. तरी योग्य समन्वय साधून राजघाटाचे पुर्ननिर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शाहू महाराज (थोरले) यांचे योगदान पुढील पिढीला कळण्यासाठी योग्य ते प्रयत्न केले जातील असे आश्वासनही मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.

याप्रसंगी मावळा फौंडेशनचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी श्री.छ. शाहू महाराज (थोरले) यांचा इतिहास, कार्य सांगत राजघाटाचे पुर्ननिर्माण करण्यासाठी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रयत्न करावेत अशी मागणी केली. यापुढील काळात सातारा, पुणे, दिल्ली येथे श्री.छ. शाहू महाराज (थोरले)यांची जयंती आणि पुण्यतिथी मावळा फौंडेशन आणि विविध संस्थांच्यावतीने करण्यात येईल. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे अभिवादन कार्यक्रम साध्या पध्दतीने घेण्यात आला. तसेच इतर सत्कार समारंभ रद्द करुन पुढील काळात पुन्हा सत्कार समारंभ घेण्यात येईल असेही श्री. कुलकर्णी यांनी सांगितले.

प्रारंभी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि विविध मान्यवर, ग्रामस्थांच्या वतीने श्री.छ. शाहू महाराज (थोरले) यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यात आले. सूत्रसंचालन नंदकुमार सावंत यांनी तर आभार अजित साळुंखे यांनी मानले. यावेळी वजीर नदाफ, अमर बेंद्रे, रवी माने, चंद्रकांत सणस, योगेश शिंदे, संजय माने, सतीश ओतारी, अभिजित बारटक्के, तुषार महामूलकर, सचिन सावंत, क्षेत्रमाहुलीचे पोपटराव जाधव, सोनगावचे प्रभाकर शिंदे, योगेश सुर्यवंशी, प्रशांत कुलकर्णी, जयहिंद मंडळ ५०१ पाटीचे पदाधिकारी, मावळा फौंडेशनचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

The post संगममाहुली येथील राजघाटाचे पुर्ननिर्माण करणार – मंत्री शिवेंद्रसिंहराजे. appeared first on Satara Pratinidhi.

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
सातारा प्रतिनिधी न्युज नेटवर्क

सातारा, दि. 26: शहीद वीर जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर आज सातारा तालुक्यातील कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

शहीद जवान शुभम घाडगे यांचे पार्थिव कामेरी गावी आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले व मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

शहीद जवान शुभम घाडगे यांचे पार्थिव अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आल्यानंतर आमदार मनोज घोरपडे, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार नागेश गायकवाड, गट विकास अधिकारी सतीश बुद्धे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सतीश हंगे यांनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली.

पोलीस व सैन्य दलाच्या जवानांच्या तुकडीने हवेमध्ये बंदुकीच्या फैरी झाडून आणि बँडपथकातर्फे अंतिम बिगुल वाजवून मानवंदना दिली. यानंतर तिरंगा ध्वज कुटुंबीयांकडे सुपुर्द करण्यात आला. वीरपत्नी अर्चना, मुलगी साईशा, आई मनिषा, वडील समाधान व भाऊ संजय यांनी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतल्यानंतर भाऊ संजय यांनी पार्थिवाला मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार केले.

यावेळी लष्कराचे विविध आजी, माजी अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

The post शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. appeared first on Satara Pratinidhi.

बनावट प्रकल्पग्रस्त दाखला सादर करुन पोलीस भरतीचा लाभ घेण्याचा प्रयत्न.
सातारा प्रतिनिधी न्युज नेटवर्क

स्थानिक गुन्हे शाखा, सातारा पथकाकडुन परजिल्हयांत वेशांतर करुन गोपणीय बातमीदार नेमुन तांत्रिक माहितीचे विश्लेषण करुन पुरावे गोळा करुन उत्कृष्ठ तपास कौशल्यातुन सन २०२२-२०२३ मधील पोलीस भरती प्रक्रियेमध्ये प्रशासनाची फसवणुक करणाऱ्या दिड वर्षापासुन पाहिजे असलेल्या आरोपीस अटक

सातारा पोलीस भरती सन २०२१ चे अनुशंगाने नोव्हेंबर २०२२ पासुन राबविणेत आलेल्या प्रक्रियेमध्ये एका उमेदवाराने संमातर आरक्षण मिळवुन भरती होणेसाठी बनावट प्रकल्पग्रस्त दाखला सादर करुन पोलीस भरतीचा लाभ घेण्याकरीता पोलीस प्रशासनाची फसवणुक केली होती. सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा व पोलीस भरती संदर्भाने असलेने गुन्हयाचा सखोल तपास होणेकामी मा. पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख यांनी गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. त्याअनुशंगाने श्री. सुनिल फुलारी पोलीस महानिरिक्षक कोल्हापुर परिक्षेत्र कोल्हापुर, श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक यांनी गुन्हयातील बनावट प्रकल्पग्रस्त दाखले उमेदवारांना पुरविणाऱ्या आरोपींची पाळेमुळे शोधुन काढणेकामी प्रभावी तपास करणेकामी स्थानिक गुन्हे शाखेचे मा. पोलीस निरीक्षक श्री. अरूण देवकर यांना सुचना दिलेल्या होत्या. त्यानुसार मा. पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनि सुधीर पाटील यांचेकडे गुन्हयाचा तपास देवुन त्यांचे अधिनस्थ पोलीस अंमलदार यांचे एक पथक तयार केले होते.

सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन तपासी अंमलदार सपोनि सुधीर पाटील यांचे पथकाने पोलीस भरतीमध्ये प्रत्यक्षात बनावट प्रकल्पग्रस्त दाखल्याचा वापर करुन प्रशासनाची फसवणुक करुन फरार असणाऱ्या उमेदवार आरोपीस यापुर्वी अहमदनगर जिल्हयात जावुन गोपणीय बातमीदारांमार्फत बातमी प्राप्त करुन शिताफीने अटक केलेले होते. त्याचेकडे सखोल तपास केलेनंतर त्यास बनावट प्रकल्पग्रस्त दाखला पुरविणारा इसम हा बीड जिल्हयातील असलेचे समजुन आले. त्याने सातारा जिल्हयाप्रमाणे महाराष्ट्रातील इतर जिल्हयात झालेल्या पोलीस भरतीमध्ये देखील उमेदवारांना बनावट प्रकल्पग्रस्तांचे दाखले पुरविलेले होते. त्यामुळे त्याचेविरुध्द गुन्हे दाखल होवुन महाराष्ट्रातील अन्य जिल्हयातील पोलीस पथकेदेखील त्याचा शोध घेणेकामी मागावर होते. त्याचा गुन्हयांत सहभाग असलेचे निष्पण्ण झालेचे त्यास समजलेपासुन तो फरार झालेला होता. तो त्याचा ठावठिकाणा कोणालाही समजून देत नव्हता. त्याच्यावर महाराष्ट्रात सातारा, अलिबाग, पुणे, गडचिरोली, यवतमाळ, याठिकाणी १० गुन्हे दाखल आहेत.

स्थानिक गुन्हे शाखा, सातारा कडील सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील व त्यांच्या अधिपत्त्याखाली असलेल्या पथकाने वेळोवेळी बीड- अहमदनगर जिल्हयात जावुन वेषांतरे करुन गोपणीय बातमीदार नेमुन माहिती प्राप्त करुन त्यातुन पुरावे गोळा करुन उपलब्ध झालेल्या तांत्रिक माहितींचे योग्य प्रकारे विश्लेषण करुन तसेच त्याचेशी कागदोपत्री तपासांची योग्य प्रकारे सांगड घालुन सातारा व महाराष्ट्रात इतर जिल्हयांत सन २०२२-२०२३ साली झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेकरीता उमेदवारांना बनावट प्रकल्पग्रस्त दाखले पुरविणाऱ्या आरोपीस शोधुन काढुन त्यास दिनांक १६/१२/२०२४ रोजी अटक केलेली आहे. त्याच्या पोलीस कोठडी रिमांडमध्ये त्याचेकडे सखोल तपास केला असता त्यास बनावट प्रकल्पग्रस्त दाखले त्याचे चुलते बळीराम दादाराव पानसरे याचे मध्यस्थीने जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथील पुनर्वसन अभिलेख विभागात कार्यरत असणाऱ्या अंशकालीन कर्मचारी जालिंदर लक्ष्मणराव गोरे याने पुरविले होते असे त्याने सांगितले. सदरचा अंशकालीन कर्मचारी सन २०२१ मध्ये कोरोना रोगाच्या साथीमध्ये मयत झालेला असुन त्याने तत्कालीन कालावधीत त्यास ज्ञात असलेल्या प्रकल्पांच्या माहितीचा गैरवापर करुन बनावट प्रकल्पग्रस्त दाखले पुरविलेले होते. असे तपासामध्ये निषण्ण झालेले असुन त्याअनुशंगाने तपास पथकाकडुन गुन्हयाचा पुढील तपास चालु आहे.

The post बनावट प्रकल्पग्रस्त दाखला सादर करुन पोलीस भरतीचा लाभ घेण्याचा प्रयत्न. appeared first on Satara Pratinidhi.

गड, किल्ला स्वच्छता मोहिमेला रायगडपासून प्रारंभ जयहिंद मंडळ, मावळा फौंडेशनचा संयुक्त उपक्रम.
सातारा प्रतिनिधी न्युज नेटवर्क

श्री.छ. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये सातारा जिल्हयाला अनन्यसाधारण महत्व आहे. जिल्हयात अनेक गड किल्ले आहेत परंतु या गड किल्ल्वार अस्वच्छता आहे तसेच दुरवस्था झालेली आहे. गड, किल्ल्याची स्वच्छता करणे, त्याचै सौंदर्य जपणे हे शिवप्रेमींची कर्तव्य असून त्यासाठी जयहिंद गणेशोत्व मंडळ आणि मावळा फौंडेशनने पुढाकार घेतला आहे.

या मोहिमेचा प्रारंभ रायगड किल्ल्यापासून होणार असून त्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते मंगळवारी रवाना झाले.

लोकमान्य टिळकांनी ज्या हेतूने गणेशोत्सव सुरु केला तो वारसा साताऱ्यातील जयहिंद गणेशोत्सव मंडळ, जयहिंद व्यायाम मंडळ चालवत आहे. या मंडळाच्यावतीने नेहमीच विविध सामाजिक आणि नाविन्यपूर्ण, समाजाला दिशा देणारे उपक्रम राबवले जातात. मंडळाने आता गड, किल्ल्याची स्वच्छता करण्याचा उपक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याला मावळा फौंडेशनचे साथ मिळाली आहे. तरुणाईने शिवाजी महाराजांचा आदर्श घेत त्यांनी निर्माण केलेले गड, किल्ले सुस्थितीत ठेवण्याचा निश्चय करावा तसेच गड, किल्ल्यांचे सौंदर्य अबाधित रहावे यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. ही मोहीम प्रत्येक महिन्याला राबवण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्याचा प्रारंभ रायगड किल्ल्यापासून होणार असून त्यासाठी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मंगळवारी रायगड किल्ल्याकडे रवाना झाले.

याप्रसंगी मावळा फौंडेशनचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, जयहिंद गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रदीप वाघमळे, सचिव अनिल जठार, खजिनदार प्रशांत वांकर, बिपीन दलाल, विजय नागर, निलेश पंडित, विशाल धबधबे आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी विनोद कुलकर्णी आणि मान्यवरांनी मनोगते व्यक्त करत मोहिमेला शुभेच्छा दिल्या. प्रत्येक महिन्याला गड, किल्ल्याची स्वच्छता करण्याचा मनोदय याप्रसंगी व्यक्त करत या मोहिमेत तरुणाईने, शिवप्रेमींनी सहभागी व्हावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

The post गड, किल्ला स्वच्छता मोहिमेला रायगडपासून प्रारंभ जयहिंद मंडळ, मावळा फौंडेशनचा संयुक्त उपक्रम. appeared first on Satara Pratinidhi.

शाहूनगर येथील घरफोडीच्या गुन्हयामध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी कडून १,२७,०००/- रूपये किंमतीचा ऐवज जप्त.
सातारा-प्रतिनिधी

(सातारा शहर डी. बी. पथकाची कारवाई – दि.१९/१२/२०२४ रोजी रात्रीचे वेळेत शाहूनगर येथील गणेश हौसिंग सोसायटीमधील एका बंद घराचा दरवाजा तोडून चोरटयाने घरामध्ये प्रवेश करून घरातील कपाटातील सोन्याचे दागिने, जुन्या काळातील पितळेची भांडी, चिल्लरचा डबा वगैरे वस्तूंची चोरी केलेली होती.

सदर झालेल्या चोरीबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.घरफोडीचे गुन्हे उघडकिस आणन्या बाबत पोलीस अधिक्षक , समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडूकर, मा. उपविभागिय अधिकारी सातारा विभाग सातारा श्री. राजीव नवले, मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र मस्के, मा. श्री. सचिन म्हेत्रे पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व पोलीस स्टाफ यांनी तांत्रिक गोष्टीचे आधारे एका संशयितास ताब्यात घेतले होते.

सदर संशयिताकडे सदर गुन्हयाबाबत तपास करित असताना त्याने सदरची घरफोडी केली असल्याचे सांगितले. तसेच सदरचा चोरीचा ऐवज त्याने लपवून ठेवला होता. तो पोलीसांनी हस्तगत केला आहे. त्याने अशाच प्रकारचे गुन्हे केले असलेबाबत पोलीसांना शंका आल्याने त्यास अधिक चौकशी केली असता त्याने डिसेंबर सन २०२३ मध्ये डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचे शाहूनगर येथील तारांगण या ऑफिसमध्ये देखील रात्रीचे वेळेत दरवाजा तोडून ऑफिसमध्ये प्रवेश करून लाकडी कपाटाचे दरवाजे तोडले होते.

परंतू सदर ऑफिसमध्ये मौल्यवान वस्तू त्यास मिळून आलेल्या नव्हत्या. त्याबाबत देखील सातारा शहर पोलीस ठाणेस गुन्हा दाखल होता. सदर आरोपीवर यापूर्वी देखील गुन्हे दाखल असून सदर आरोपीस मा. कोर्टाने ३ दिवसांची पोलीस कस्टडी दिलेली आहे.सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक, समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. वैशाली कडूकर, मा. उपविभागिय अधिकारी सातारा विभाग सातारा श्री. राजीव नवले, मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र मस्के, मा. श्री. सचिन म्हेत्रे पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. शाम काळे, पोलीस उपनिरीक्षक श्री. सुधीर मोरे, पो.हवा. किशोर जाधव, निलेश यादव, सुजीत भोसले, शंकर निलेश जाधव, विक्रम माने, पो.ना. पंकज मोहिते, पो.कॉ. सचिन रिटे, इरफान मुलाणी, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, तुषार भोसले यांनी केलेली आहे.

The post शाहूनगर येथील घरफोडीच्या गुन्हयामध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी कडून १,२७,०००/- रूपये किंमतीचा ऐवज जप्त. appeared first on Satara Pratinidhi.