#mybmc #mumbai Archives - Satara Pratinidhi

महापौरांच्या नव्या गाडीवरील लाल-निळ्या दिव्यांवरून वाद; चर्चेनंतर पालिकेकडून फ्लॅशर दिवे तातडीने काढले
मुंबई प्रतिनिधी

मुंबई : मुंबई महापालिकेच्या महापौर रितू तावडे यांच्या नव्या वाहनावर लाल व निळे लुकलुकणारे दिवे बसवण्यात आल्याने समाजमाध्यमांवर आणि राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. केंद्र सरकारने २०१७ मध्ये सामान्य सरकारी वाहनांवर लाल दिवा वापरण्यास बंदी घातलेली असतानाही महापौरांच्या वाहनावर असे दिवे दिसल्याने नियमभंग झाल्याचा आरोप होत होता. मात्र या प्रकरणाची दखल घेत बृहन्मुंबई महानगरपालिकेने संबंधित वाहनांवरील फ्लॅशर दिवे काढून टाकल्याचे स्पष्ट केले आहे.

पालिकेच्या जनसंपर्क विभागाने आज रविवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात सांगितले की, पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण झाल्यानंतर त्यांना अधिकृत वाहने उपलब्ध करून दिली जातात. या वाहनांवर लुकलुकणारे दिवे बसवण्यात आल्याची बाब माध्यमांतून समोर आल्यानंतर तातडीने त्याची दखल घेण्यात आली. त्यानुसार महापौरांसह पदाधिकाऱ्यांच्या वाहनांवरील फ्लॅशर दिवे काढून टाकण्यात आले असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

महापौरांच्या वाहनावर छतावर नव्हे तर पुढील भागात लाल आणि निळ्या रंगाचे दिवे बसवण्यात आल्याचे छायाचित्र समाजमाध्यमांवर व्हायरल झाले होते. तसेच त्यांच्या ताफ्यात पोलिसांच्या वाहनासारखी लाल-निळ्या दिव्यांची स्कॉर्पिओ गाडी दिसल्याने व्हीआयपी संस्कृती पुन्हा सुरू झाल्याची टीकाही होत होती.

केंद्र सरकारने १ मे २०१७ रोजी प्रसिद्ध केलेल्या राजपत्र अधिसूचनेनुसार सामान्य सरकारी वाहनांवर लाल दिवा, ध्वज, नावफलक किंवा अधिकार दर्शवणारी चिन्हे लावण्यास बंदी घातली आहे. अग्निशमन दल, पोलीस, संरक्षण दल, अर्धसैनिक दल तसेच आपत्ती व्यवस्थापन सेवांच्या वाहनांनाच विशेष परिस्थितीत रंगीत दिवे वापरण्याची परवानगी आहे. वाहन अधिकृत कामावर नसताना अशा दिव्यांचा वापर करणे बेकायदेशीर मानले जाते.

दरम्यान, अलीकडेच महापालिकेने पदाधिकाऱ्यांसाठी नव्या वाहनांची खरेदी केली आहे. परिवहन विभागामार्फत महापौर, उपमहापौर आणि विविध समित्यांच्या अध्यक्षांसाठी एकूण १३ वाहने घेण्यात आली आहेत. महापौरांसाठी इनोव्हा वाहन तर उपमहापौर आणि वैधानिक तसेच विशेष समित्यांच्या अध्यक्षांसाठी स्कॉर्पिओ वाहने देण्यात आली आहेत.

या खरेदीमध्ये इनोव्हा वाहनासाठी सुमारे ३० लाख रुपये, तर प्रत्येक स्कॉर्पिओसाठी सुमारे १८ लाख रुपये खर्च करण्यात आले असून एकूण खर्च अंदाजे २ कोटी १६ लाख रुपये आहे. प्रभाग समिती अध्यक्षांसाठी मात्र भाडेतत्त्वावर वाहने उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती पालिकेने दिली.

The post महापौरांच्या नव्या गाडीवरील लाल-निळ्या दिव्यांवरून वाद; चर्चेनंतर पालिकेकडून फ्लॅशर दिवे तातडीने काढले appeared first on Satara Pratinidhi.

एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा मुंबईत शुभारंभ; १४–१५ वर्षे वयोगटातील मुलींना पहिल्या टप्प्यात लस महानगरपालिका शाळांतील २४,९३६ मुलींचा समावेश
मुंबई प्रतिनिधी

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी देशव्यापी एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहिमेचा मुंबईसह महाराष्ट्रात शनिवारी शुभारंभ करण्यात आला. बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या वतीने मुंबई सेंट्रल येथील टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय व बाई य. ल. नायर धर्मादाय रुग्णालय येथे झालेल्या कार्यक्रमात राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, महापौर रितू तावडे व उपमहापौर संजय घाडी यांच्या हस्ते पाच लाभार्थी मुलींना लस देऊन मोहिमेची सुरुवात करण्यात आली.

राष्ट्रीय स्तरावर या मोहिमेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजमेर (राजस्थान) येथून सकाळी केला. त्यानंतर राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मुंबईत दाखविण्यात आले.

महापौर रितू तावडे यांनी पालकांना आवाहन करताना सांगितले की, “एचपीव्ही लस सुरक्षित असून मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळते. पालकांनी निश्चिंतपणे मुलींना लसीकरणासाठी पुढे आणावे.”

तीन महिन्यांची विशेष मोहीम; २८४ केंद्रांवर सुविधा

महानगरपालिकेच्या माहितीनुसार, १४ वर्षे पूर्ण व १५ वर्षांखालील वयोगटातील सुमारे १.३० लाख मुली मुंबईत पात्र आहेत. पहिल्या टप्प्यात महानगरपालिका शाळांतील २४,९३६ मुलींना लस दिली जाईल. पुढील टप्प्यात खासगी व अनुदानित शाळांतील मुलींचा समावेश होणार आहे.

लसीकरणासाठी महानगरपालिकेची २३६ आरोग्य केंद्रे, २७ प्रसूतिगृहे, १६ सर्वसाधारण रुग्णालये व ५ वैद्यकीय महाविद्यालये – अशा एकूण २८४ संस्थांमध्ये सुविधा उपलब्ध राहणार आहे. पुढील तीन महिने विशेष मोहीम राबवून नंतर हा कार्यक्रम नियमित लसीकरणात समाविष्ट केला जाईल.

‘गार्डसिल-४’ची एक मात्रा; ‘यु-विन’वर नोंदणी

या मोहिमेत ‘गार्डसिल-४’ (Gardasil-4) या एचपीव्ही लसीची ०.५ मिली मात्रा डाव्या दंडात देण्यात येणार आहे. लसीकरणानंतर लाभार्थींची नोंदणी व प्रमाणपत्र वितरण ‘यु-विन’ (U-WIN) या केंद्र शासनाच्या डिजिटल पोर्टलवरून केले जाईल. पालकांची संमती आवश्यक असून लसीकरण ऐच्छिक आहे.

कर्करोग प्रतिबंधात महत्त्व

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) संसर्गामुळे होतो आणि लसीकरणाने टाळता येणाऱ्या कर्करोगांपैकी एक आहे. भारतात महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांमध्ये याचा दुसरा क्रमांक लागतो. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनाने एचपीव्ही लस राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट करण्याची शिफारस केली आहे.

सौम्य दुष्परिणाम शक्य

लसीकरणानंतर ताप, डोकेदुखी किंवा इंजेक्शनच्या ठिकाणी सूज अशी सौम्य लक्षणे दिसू शकतात; ती २–३ दिवसांत कमी होतात. गंभीर आजार, यीस्ट ॲलर्जी किंवा गर्भावस्था असल्यास लस देण्यात येणार नाही. प्रत्येक केंद्रावर प्रतिकूल घटना व्यवस्थापनासाठी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध राहणार आहेत.

महानगरपालिकेने पालकांना आवाहन केले आहे की, पात्र वयोगटातील मुलींना या मोहिमेद्वारे लसीकरण करून भविष्यातील गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा धोका टाळावा.

The post एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा मुंबईत शुभारंभ; १४–१५ वर्षे वयोगटातील मुलींना पहिल्या टप्प्यात लस महानगरपालिका शाळांतील २४,९३६ मुलींचा समावेश appeared first on Satara Pratinidhi.