Maharashtra Winter Session Archives - Satara Pratinidhi

दादर स्थानकाचे नाव आता ‘चैत्यभूमी’ होणार! अधिवेशनात नामकरणाचा मार्ग मोकळा; १५ लाख अनुयायांसाठी मुंबईत जय्यत तयारी
मुंबई प्रतिनिधी

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांसाठी महत्त्वाची घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादर रेल्वे स्थानकाचे नामकरण ‘चैत्यभूमी’ करण्याची प्रक्रिया आगामी विधिमंडळ अधिवेशनात पूर्ण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नामकरणाच्या मागणीला आता निर्णायक दिशा मिळाली आहे. दुसरीकडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ५ आणि ६ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात तब्बल १५ लाख अनुयायी दाखल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर निवास, भोजन, पिण्याचे पाणी, आरोग्य, स्वच्छता, वाहतूक आणि सुरक्षेच्या व्यवस्थांचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, गृह राज्यमंत्री योगेश कदम, माजी मंत्री संजय बनसोडे, समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, भाई गिरकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस प्रशासन, रेल्वे अधिकारी, मुंबई महापालिकेचे प्रतिनिधी आणि बौद्ध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

दादर स्थानकाच्या नामकरणाचा अधिवेशनात निर्णय

दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याची मागणी अनेक वर्षांपासून आंबेडकरी अनुयायांकडून केली जात आहे. या मागणीला राज्य सरकारने यापूर्वीच तत्त्वतः मान्यता दिली असून, केंद्र सरकारलाही यासंदर्भात पत्र पाठविण्यात आले आहे.

मात्र, रेल्वे स्थानकाच्या नामकरणासाठी विधिमंडळाच्या समितीशी संबंधित काही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याचे केंद्र सरकारकडून कळविण्यात आले आहे. त्यामुळे आगामी विधिमंडळ अधिवेशनात ही प्रक्रिया पूर्ण करून नामकरणाची पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

या घोषणेमुळे दादर स्थानकाच्या नामकरणाचा विषय पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. नामकरणाची विधिमंडळातील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केंद्र सरकारच्या पुढील औपचारिक कार्यवाहीकडे लक्ष लागले आहे.

१५ लाख अनुयायी; मुंबई प्रशासनाची कसोटी

६ डिसेंबर हा दिवस देशभरातील आंबेडकरी अनुयायांसाठी अत्यंत श्रद्धेचा आणि भावनिक महत्त्वाचा दिवस आहे. दरवर्षी महाराष्ट्रासह देशाच्या विविध राज्यांतून लाखो अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल होतात.

यंदा ७० वा महापरिनिर्वाण दिन असल्याने ५ आणि ६ डिसेंबर रोजी अनुयायांची संख्या सुमारे १५ लाखांपर्यंत जाण्याचा अंदाज बैठकीत व्यक्त करण्यात आला. ही वाढती गर्दी लक्षात घेऊन मागील वर्षांतील त्रुटी दूर कराव्यात. अनुयायांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

चैत्यभूमी परिसरात निवास, विश्रांती, भोजन, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, वैद्यकीय सुविधा आणि स्वच्छतेची पुरेशी व्यवस्था करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

आंदोलनांना बंदी; वाहतुकीसाठी विशेष नियोजन

महापरिनिर्वाण दिनाच्या काळात चैत्यभूमी परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. या पार्श्वभूमीवर चैत्यभूमी परिसरात धरणे, निदर्शने, मोर्चे आणि आंदोलनांना अधिकृतपणे बंदी घालण्याबाबत गृह विभागाने आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश फडणवीस यांनी दिले.

वाहतुकीच्या नियोजनासाठी ऑटोरिक्षांच्या प्रवेशावर मर्यादा घालण्याबरोबरच रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचा समन्वय साधण्यास सांगण्यात आले आहे. अनुयायांना मुंबईत आल्यानंतर चैत्यभूमीपर्यंत आणि पुढील प्रवासासाठी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी विशेष व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

राज्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्व पुतळ्यांची स्वच्छता आणि सुशोभीकरणाची कामे पुढील पाच ते सात दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

इंदू मिल स्मारकासाठी वाढीव निधी देणार

मुंबईतील इंदू मिल परिसरात उभारण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य आंतरराष्ट्रीय स्मारकाचा मुद्दाही बैठकीत चर्चेला आला. स्मारकाचे बहुतांश काम पूर्ण झाले असले, तरी मुख्य पुतळ्याच्या कामासह काही महत्त्वाच्या बाबी अद्याप प्रलंबित आहेत.

कामाच्या खर्चात वाढ झाली तरी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. आवश्यक तेवढा वाढीव निधी उपलब्ध करून देण्याची शासनाची तयारी आहे. स्मारकाचे उर्वरित काम वेगाने पूर्ण करण्यासाठी पुढील आठवड्यात स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, एप्रिल २०२६ मध्ये एमएमआरडीएने स्मारक प्रकल्पातील सहायक इमारतींचे संरचनात्मक काम पूर्ण झाल्याची माहिती दिली होती. हा प्रकल्प सुमारे १,०८९ कोटी रुपयांचा असल्याचे त्यावेळी जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे आता मुख्य पुतळ्यासह उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी शासन कोणती कालमर्यादा निश्चित करते, याकडे आंबेडकरी अनुयायांचे लक्ष लागले आहे.

एकनाथ शिंदेंची ग्वाही; निवासासाठी जर्मन हँगर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही महापरिनिर्वाण दिनासाठी मुंबईत येणाऱ्या लाखो अनुयायांची कोणतीही गैरसोय होऊ देणार नसल्याची ग्वाही दिली.

अनुयायांच्या निवास, विश्रांती आणि भोजनासाठी मोठे मंडप तसेच जर्मन हँगर उभारण्यात येणार आहेत. पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य सुविधा, पोलीस बंदोबस्त आणि रेल्वे सेवांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. महापरिनिर्वाण दिनासाठी मुंबईत येणाऱ्या वाहनांना टोल सवलत देण्याबाबतही सकारात्मक विचार करण्यात येईल, असे शिंदे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी अनुयायांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना केल्या. चैत्यभूमीसह मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध ठेवाव्यात आणि सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

उत्सवी कार्यक्रम नको; बाबासाहेबांच्या विचारांचा जागर

महापरिनिर्वाण दिनाचे गांभीर्य आणि पावित्र्य कायम राखण्यावरही मुख्यमंत्र्यांनी भर दिला. या दिवशी उत्सवी स्वरूपाचे कार्यक्रम आयोजित करण्याऐवजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रपटांचे प्रदर्शन, त्यांच्या साहित्याचा प्रसार आणि विचारांशी सुसंगत उपक्रम आयोजित करण्याबाबत प्रशासनाने विचार करावा, असे त्यांनी सांगितले.

एकीकडे दादर स्थानकाच्या ‘चैत्यभूमी’ नामकरणाचा मार्ग अधिवेशनात मोकळा करण्याची घोषणा, तर दुसरीकडे इंदू मिल स्मारकासाठी वाढीव निधीची ग्वाही आणि १५ लाख अनुयायांच्या स्वागतासाठी प्रशासनाची तयारी, अशा तीन महत्त्वाच्या मुद्द्यांमुळे यंदाचा महापरिनिर्वाण दिन विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. आता घोषणांचे प्रत्यक्ष निर्णय आणि सुविधांची अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते, याकडे आंबेडकरी समाजाचे लक्ष लागले आहे.

The post दादर स्थानकाचे नाव आता ‘चैत्यभूमी’ होणार! अधिवेशनात नामकरणाचा मार्ग मोकळा; १५ लाख अनुयायांसाठी मुंबईत जय्यत तयारी appeared first on Satara Pratinidhi.