Electric Buses Archives - Satara Pratinidhi

बेस्टच्या तिकिटासाठी आता सुट्ट्या पैशांची गरज नाही; यूपीआय पेमेंटचा पर्याय लवकरच उपलब्ध होणार
मुंबई प्रतिनिधी

मुंबई : बेस्ट बसने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना तिकीट काढताना सुट्ट्या पैशांसाठी करावी लागणारी धावपळ लवकरच थांबण्याची शक्यता आहे. बेस्टच्या बसमध्ये यूपीआयद्वारे तिकीट खरेदी करण्याची सुविधा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. शुक्रवारी झालेल्या समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी दर्शविण्यात आली. समिती सदस्य अजय सिंह यांनी हा प्रस्ताव मांडला होता.

प्रस्तावानुसार, बस कंडक्टरच्या ओळखपत्राच्या पट्ट्यावर स्वतंत्र क्यूआर कोड लावण्यात येणार आहेत. याशिवाय बस आणि बस डेपोमध्येही क्यूआर कोड उपलब्ध करून दिले जाणार आहेत. प्रवाशांना मोबाईलद्वारे हा कोड स्कॅन करून तिकिटाचे पैसे भरता येतील. त्यानंतर कंडक्टरकडून तिकीट घेता येणार आहे. या सुविधेमुळे रोख रकमेवरील अवलंबित्व कमी होण्यासह सुट्ट्या पैशांवरून प्रवासी आणि कंडक्टर यांच्यात होणारे वादही टाळता येतील, असा प्रस्तावामागील उद्देश आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळासह अनेक ठिकाणी सार्वजनिक वाहतुकीत डिजिटल पेमेंटचा वापर सुरू असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत, असे अजय सिंह यांनी सांगितले. बेस्ट प्रशासनाकडूनही ही सुविधा लवकरच कार्यान्वित करण्याची तयारी सुरू आहे.

बेस्टच्या ताफ्यात ४८ नव्या एसी बस

दुसरीकडे, मुंबईकरांच्या प्रवासाची सोय वाढविण्यासाठी बेस्टच्या ताफ्यात ४८ वातानुकूलित एकमजली बस दाखल झाल्या आहेत. या बस एका चार्जिंगवर २३० ते २३५ किलोमीटर अंतर पार करू शकतात. त्यामुळे दिवसभर या बस प्रवासी सेवेत उपलब्ध ठेवणे शक्य होणार आहे. बेस्टच्या बसचा ताफा तीन हजारांखाली आल्याने प्रवाशांच्या अडचणी वाढल्या होत्या. नव्या बसच्या समावेशामुळे प्रवासी सेवेवरील ताण कमी होण्याची अपेक्षा आहे.

The post बेस्टच्या तिकिटासाठी आता सुट्ट्या पैशांची गरज नाही; यूपीआय पेमेंटचा पर्याय लवकरच उपलब्ध होणार appeared first on Satara Pratinidhi.