#Commissioner Mumbai Police #cpmumbaipolice#cm eknath shinde# Devendra Fadnavis#bandra kherwadi police station#Ajit Pawar Archives - Satara Pratinidhi

मुंबईतील नायर हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेजमधील विध्यार्थीनीचा लैगिक छळ. म.न.से पक्षांनी समोर आणला.
सातारा प्रतिनिधी नेटवर्क

मुंबईतील महानगरपालिकेच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी विद्यार्थींनीचा लैंगिक छळ झाल्याचा प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने समोर आणला आहे. नायर हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थीनी एका प्रोफेसरकडून लैंगिक छळ झाल्याची तक्रार केली होती. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर पावले उचलली आहे.

रुग्णालयातील लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणाची गंभीर दखल घेत डीनच्या बदलीचे तसेच विशेष चौकशी समिती नेमण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई मनपा आयुक्त भूषण गगराणी यांना रुग्णालयाच्या डीनची तात्काळ बदली करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्याचे आदेश दिले. तसेच रुग्णालयातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त उपाययोजना राबवण्यातचे सांगितले.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटले की, सोमवारी नायर वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना भेटलो. त्या ठिकाणी घडलेल्या लैंगिक छळाच्या प्रकरणानंतर सगळे जण प्रचंड दहशती खाली आहेत. नायरची वाटचाल कोलकात्ताच्या दिशेने होत आहे. महापालिका प्रशासनाने हे प्रकरण संवेदनशीलपणे हाताळले पाहिजे. विद्यार्थीनींनी आम्हाला सांगितले की, त्यांचा लैंगिक छळ महाविद्यालयात होत आहे. यासंदर्भात वारंवार तक्रार करुनही कारवाई होत नाही. पॉश कमिटीने केलेल्या चौकशीत एक जण दोषी अढळला आहे. त्याला नायर परिसरातून बाहेर काढण्याऐवजी त्याच परिसरात क्वार्टर देण्यात आले आहे.

मानवतावादी दृष्टिकोन ठेवून ही क्वार्टर देण्यात आल्याच पत्रक काढण्यात आले आहे. आमची तक्रार केल्यास एट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. संदीप देशपांडे यांनी सांगितले की, पोलीस स्टेशनला मुलगी तक्रार करायला गेल्यावरही एक महिला पोलिसाकडून स्टेटमेंट घेण्याऐवजी पुरुष पोलीस अधिकारी तिथे उभा करण्यात आला. आरोपीचा नंतर एन्काउंटर करण्याऐवजी घटना घडताना थांबवणे गरजेचे आहे. त्याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी. एका वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याकडून या प्रकरणाची चौकशी करावी. मनसे या विद्यार्थ्यांच्या मागे आहे. त्या प्राध्यपकाविरोधात तक्रार देण्यास विद्यार्थ्यानी समोर यावे.

ज्यावेळी आमच्याकडे अधिकृत तक्रार येईल, तेव्हा प्रशासन काय कारवाई करते त्याची वाट आम्ही पाहणार नाही. आम्ही आमच्या स्टाईलने कारवाई करु, असे त्यांनी म्हटले. भाजप नेत्या चित्रा वाघ या प्रकरणावर म्हणाल्या, मुलींची परीक्षा असल्याने गुन्हा दाखल केला नाही. आज देखील मुलींनी जाऊन गुन्हा दखल करावा. आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहोत. शासन प्रशासन मुलींसोबत आहेत. संबंधित कोणीही आरोपी असतील त्यांना निश्चित शिक्षा होईल. या प्रकरणाचा संबंध दोन ते तीन प्राध्यापक अन् डीनशी आहे का? त्याची चौकशी होईल. कोणालाही पाठिशी घालण्यात येणार नाही, असे चित्रा वाघ यांनी म्हटले.

The post मुंबईतील नायर हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेजमधील विध्यार्थीनीचा लैगिक छळ. म.न.से पक्षांनी समोर आणला. appeared first on Satara Pratinidhi.

दोन वर्षांपासून एक विद्यार्थाीनीवर लैंगिक अत्याचाराची आणखी एक उघड झाली आहे. कोचिंग सेंटर चालवणाऱ्या तीन भावांकडून या १५ वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. गेल्या २ वर्षांपासून पीडिता हा आत्याचार सहन करत आहे, असं तिने पोलिसांना सांगितलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, दक्षिण मुंबईत ही घटना घडली आहे. कोचिंग सेंटरमध्ये मला लेक्चर सुरू होण्याआधी लवकर बोलवलं जायचं. त्यानंतर क्लास संपल्यावर देखील जास्त वेळ थांबवून उशिरा सोडलं जायतं. तिन्ही सरांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केला असल्याचं या मुलीने म्हटलं आहे.

बाल विकास केंद्राच्या अधिकाऱ्यांकडून या मुलीचे समुपदेशन सुरू होते. त्यावेळी तिने या सर्व गोष्टींचा उलगडा केला आहे. मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं समजताच बाल विकास केंद्राच्या अधिकाऱ्यांकडून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत दोन भावांना अटक केलीये. तर मोठा भाऊ अद्याप फरार आहे.

तिन्ही भाऊ २४, २५ आणि २७ या वयोगटातील आहेत. ते दक्षिण मुंबईत राहतात आणि एक कोचिंग सेंटर चालवतात. येथे ७वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांचा क्लास घेतला जातो. यामध्ये ३५ ते ४० मुली शिक्षण घेतात.

२०२२ मध्ये या मुलीच्या पालकांचा घटस्फोट झाला. त्यामुळे ती आपल्या आईसह राहत होती. यावेळी तिने नवीन शाळेत प्रवेश घेतला. शाळा नवीन असल्याने ती जास्त टिचर्ससह बोलत नव्हती तसेच अन्य विद्यार्थ्यांशी सुद्धा कमी बोलायची. त्यामुळे अभ्यासातील अडचणी दूर करण्यासाठी तिने कोचिंग सेंटर देखील लावलं होतं. काही दिवसांनी तिच्या आईला मुलीच्या वागण्यात बराच बदल जाणवला. त्यामुळे २०२३ मध्ये बाल विकास केंद्राशी संपर्कसाधत तिचे समुपदेशन सुरू करण्यात आले. काही दिवसांनी तिने येथे जाणे बंद केले.

त्यानंतर पीडिता पुन्हा फेब्रुवारी २०२४ मध्ये येथे दाखल झाली. यावेळी तिने तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल माहिती दिली. तसेच बदनामीच्या भीतीने आपल्या आईला याबद्दल काही सांगू नये असं म्हटलं. मात्र त्यांनी तिच्या आईला सांगितले. आईला सांगितल्यावर भीतीने आईने देखील पोलिसांत तक्रार करण्यास नकार दिला. त्यामुळे बाल विकास केंद्राच्या अधिकाऱ्यांकडून पोलिसात गुन्हा दाखल असून याबाबत अधिक तपास सुरू आहे.

The post  appeared first on Satara Pratinidhi.

कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने डोंबिवली जवळील काटई बदलापूर रस्त्यावरील मानपाडा येथील मौर्या ढाब्याच्या बाजुला तीन जणांकडून व्हेल माशाची उलटी (ओकारी) जप्त केली. हे आरोपी पनवेल जवळील रहिवासी आहेत.

या उलटीची बाजारातील किंमत सहा कोटी २२ लाख रूपये आहे. अनिल राधाकृष्ण भोसले, अंकुश शंकर माळी, लक्ष्मण शंकर पाटील अशी अटक आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी पनवेल परिसरातील वावंजे-मोहोदर, कासव, न्यू पनवेल भागातील रहिवासी आहेत. आरोपींना कल्याण न्यायालयाने मंगळवार पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

कल्याण गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांना पनवेल भागातील तीन जण डोंबिवली परिसरात व्हेल माशाची उलटी विक्री करण्यासाठी येणार आहेत, अशी गुप्त माहिती मिळाली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, साहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली काटई बदलापूर रस्ता भागात पोलिसांनी सापळा लावला. ठरल्या वेळेत तीन जण मानपाडा भागातील मौर्या ढाब्या जवळ एक मोटारीतून आले. पोलिसांनी या मोटीराला घेरले.मोटारीतील तीन जणांची चौकशी केली. ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले.त्यांच्या जवळील सफेद बंदिस्त पिशवीची पोलिसांनी झडती घेतली.

त्यामध्ये व्हेल माशाची उलटी आढळून आली. ही उलटी पाच किलो साडेसहाशे ग्रॅम वजनाची होती. व्हेल माशाच्या उलटीची बेकायदा वाहतूक करून बाजारात विक्री करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पोलिसांनी वन्य जीव संरक्षण कायद्याने आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत साहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, दत्ताराम भोसले, हवालदार गुरूनाथ जरग, विश्वास भावे, विलास कडू, मिथुन राठोड, गोरक्ष रोकडे, महिला हवालदार सहभागी झाले होते. ही उलटी आरोपींनी कोणाला विक्री करण्यासाठी आणि कोठून आणली होती याचा तपास सुरू केला आहे.

The post  appeared first on Satara Pratinidhi.

लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एक आठवड्यापूर्वी एन्काऊंटर झाला. मात्र त्याच्या अंत्यविधीसाठी जागा निश्चित झालेली नव्हती. अखेर त्याबाबतची मोठी बातमी समोर आली आहे.

अक्षय शिंदेचा उल्हासनगरमधील शांतीनगर स्मशानभूमीत दफनविधी पार पडला आहे. अक्षय शिंदेच्या शवावर बदलापूर शहरात अंत्यसंस्कार करण्यास नागरिकांचा विरोध होता. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी अंबरनाथ पालिकेत जाऊन दफनविधीसाठी जागा देण्याची परवानगी मागितली होती.

परंतु त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला नव्हता. मनसेच्या कार्यकर्त्यांनी देखील आंदोलन केलं होतं.अखेर रविवारी पोलिसांच्या सुरक्षेत उल्हासनगरमधील शांतीनगर स्मशानभूमीत अक्षय शिंदेचा दफनविधी पार पडला. राज्य सरकारनं अक्षय शिंदेचा अंत्यविधी सोमवारपर्यंत करण्याची ग्वाही मुंबई उच्च न्यायालयाला दिलेली होती.शांतीनगर स्मशानभूमीत पोलिसांकडून खड्डा खणण्यात आला होता. इथेच अक्षयचा मृतदेह दफन केला गेला.

अक्षय शिंदे याने बदलापूरमधील एका शाळेतील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले होते. हा प्रकार उघडकीस येताच नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली. बदलापूर रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले होते.

तसेच आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. पुढे जाऊन पोलिसांनी त्याला अटक करत न्यायालयात हजर केले होते. आरोपी अक्षय शिंदेने आपल्या गुन्ह्याची कबुली सुद्धा दिली होती. अशातच सोमवारी २३ सप्टेंबर रोजी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला.

कळवा तुरुंगातून नेण्यात येत असताना त्यानं पोलीस वाहनात गोळीबार केला. पोलीस कर्मचाऱ्याची बंदूक खेचून त्यानं गोळ्या झाडल्या. त्यामुळे पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला. त्यात अक्षयचा मृत्यू झाला, असा घटनाक्रम सांगण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितलेल्या घटनाक्रमावर, त्यांच्या दाव्यांवर मुंबई उच्च न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तसेच विरोधकांनी सुद्धा राज्य सरकारवर हल्लाबोल केला होता. दरम्यान,या एन्काऊंटर प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी सीआयडीकडे देण्यात आली आहे. त्यामुळे आता पुढील तपासाकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे.

The post  appeared first on Satara Pratinidhi.

मुंबई पोलीस दलातील पाच पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जारी
वार्ताहर-स्वप्‍नील गाडे

मुंबईत शुक्रवारी शहरातील पाच पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.तेजस्विनी सातपुते यांची पुणे तर राजतीलक रोशन यांच्यांकडे राज्याच्या कायदा वसुव्यवस्था सहाय्यक पोलीस महानिरीक्षक पदाची जबाबदारी हाती दिली आहे.

सुरक्षा विभागाचे पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांची परिमंडळ पाच,परिमंडळ आठचे पोलीस उपायुक्त दीक्षित कुमार गेडाम यांची परीमंडळ नऊ,संरक्षण विभागाचे पोलीस उपायुक्त मनीष कालसानिया यांची परिमंडळ आठ मध्ये बदली करण्यात आली आहे.

शुक्रवारी मुंबई शहरातील पाच पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या त्याचे आदेश जारी करण्यात आलेत.संरक्षण व सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पो.निरीक्षक राजीव शेजवळ यांची वडाळा पोलीस ठाणे,गुन्हे शाखेचे साहाय्यक पो.आयुक्त शैलेश पासलवार यांची घाटकोपर विभागात,लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महेश बळवंतराव यांची एमएचबी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे

The post मुंबई पोलीस दलातील पाच पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जारी appeared first on Satara Pratinidhi.