सोलापूर Archives - Satara Pratinidhi

महात्मा फुले जयंतीनिमित्त सोलापूर महापालिकेकडून अभिवादन; समाजप्रबोधनाच्या वारशाला उजाळा
सोलापूर प्रतिनिधी

महान समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शहराच्या मध्यवर्ती भागातील सुपर मार्केट परिसरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास तसेच कॉन्सील हॉल येथील महापौर कार्यालयात असलेल्या त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमातून महात्मा फुले यांच्या समाजप्रबोधनाच्या कार्याची आठवण करून देत त्यांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता अधोरेखित करण्यात आली.

महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते प्रमुख अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, नगरसेवक सत्यजित वाघमोडे, नगरसेविका कल्पना कदम, नगरसेविका सारिका खजुरगी, नगरसेवक प्रशांत पल्ली, नगरसेवक सिद्धेश्वर कमटम, नगरसेवक विजय चिप्पा, महेश देवकर, संतोष कदम यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहायक आयुक्त (समाज कल्याण) सुलोचना सोनावणे आणि कामगार कल्याण अधिकारी अजितकुमार खानसुळे यांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या विचारांचे स्मरण केले. शिक्षणाचा प्रसार, स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार, जातिव्यवस्थेविरोधातील लढा आणि शेतकरी-श्रमिकांच्या हक्कांसाठी केलेले प्रयत्न या माध्यमातून फुले यांनी भारतीय समाजात परिवर्तनाची बीजे पेरली, असे मत व्यक्त करण्यात आले.

महापौर कोंड्याल यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “महात्मा फुले यांचे विचार केवळ ऐतिहासिक नाहीत, तर आजच्या समाजजीवनालाही दिशा देणारे आहेत. सामाजिक समतेचा आणि शिक्षणाचा संदेश पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.” त्यांनी शहरातील नागरिकांनी फुले यांच्या विचारांचा अंगीकार करून सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहनही केले.

कार्यक्रमात उपस्थितांनी ‘सत्यशोधक’ परंपरेचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. महात्मा फुले यांनी उभारलेल्या समाजसुधारणेच्या चळवळीमुळेच आज शिक्षण, समता आणि सामाजिक न्याय यांची पायाभरणी झाली, याची जाणीव यावेळी सर्वांनी व्यक्त केली.

दरम्यान, सोलापूर शहरातील विविध सामाजिक संस्थांनीही स्वतंत्रपणे महात्मा फुले जयंती साजरी करत त्यांच्या कार्याला अभिवादन केले. अनेक ठिकाणी व्याख्यानमाला, रक्तदान शिबिरे आणि समाजजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमधून महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रसार अधिक व्यापक स्तरावर करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

महापालिकेच्या या अभिवादन कार्यक्रमातून सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या महात्मा फुले यांच्या कार्याची पुन्हा एकदा उजळणी झाली. त्यांच्या विचारांचा वारसा जपत समताधिष्ठित समाज निर्माण करण्याचा संदेश या निमित्ताने देण्यात आला.

The post महात्मा फुले जयंतीनिमित्त सोलापूर महापालिकेकडून अभिवादन; समाजप्रबोधनाच्या वारशाला उजाळा appeared first on Satara Pratinidhi.

सोलापूरात एसआरपीएफ जवानाची आत्महत्या; हसता खेळता संसार एका क्षणात संपला
सोलापूर प्रतिनिधी

सोलापूर : दौंड येथील राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) गट क्रमांक ७ मध्ये कार्यरत असलेल्या जवानाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विलास सर्जेराव शिंदे (३५) असे मृत जवानाचे नाव असून ही घटना गुरुवारी (१२ मार्च) सायंकाळी साडेसातच्या सुमारास मुळेगाव (दक्षिण) परिसरात घडली.

मूळचे कळंब (जि. धाराशिव) येथील रहिवासी असलेले शिंदे मागील काही वर्षांपासून सासरच्या घरी मुळेगाव येथे पत्नी व मुलांसह राहत होते. शिंदे हे दौंड येथे एसआरपीएफमध्ये कार्यरत होते, तर त्यांची पत्नी पूनम शाम काळे या सोलापूर शहर पोलीस मुख्यालयात पोलीस म्हणून कार्यरत आहेत.

गुरुवारी रात्री आठच्या सुमारास शिंदे यांनी राहत्या घरात गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. ही माहिती मिळताच नातेवाईकांनी त्यांना तातडीने सोलापूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात करण्यात आले.

नातेवाईकांच्या माहितीनुसार, विलास शिंदे व पूनम काळे यांचा २०१४ मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यांच्या पश्चात आई, पत्नी तसेच ५ वर्षांची मुलगी व ३ वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली असून तालुका पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

The post सोलापूरात एसआरपीएफ जवानाची आत्महत्या; हसता खेळता संसार एका क्षणात संपला appeared first on Satara Pratinidhi.

पोलिस भरतीची लेखी परीक्षा रविवारी; उमेदवारांनी सकाळी ८ वाजताच केंद्रावर हजर राहावे ७३ पदांसाठी ८८६ उमेदवारांची चुरस; आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवण्याचे आवाहन
सोलापूर प्रतिनिधी

सोलापूर शहर पोलिस दलातील पोलिस भरती प्रक्रियेला आता अंतिम टप्पा गाठला असून रविवारी (ता. १५) लेखी परीक्षा पार पडणार आहे. या परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना सकाळी ८ वाजताच परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षा मात्र सकाळी ११ ते दुपारी १२.३० या वेळेत होणार असली तरी सुरक्षा तपासणी व अन्य प्रक्रिया लक्षात घेता उमेदवारांनी वेळेआधीच हजर राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.

सोलापूर शहर पोलिस दलातील ७३ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. लेखी परीक्षेसाठी एकूण ८८६ उमेदवार पात्र ठरले असून त्यांची परीक्षा अक्कलकोट रोडवरील एसव्हीसीएस हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज येथे घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील ९० पदांसाठी १,०४४ उमेदवार लेखी परीक्षा देणार असून त्यांचे परीक्षा केंद्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासमोरील अभियांत्रिकी महाविद्यालयात निश्चित करण्यात आले आहे.

राज्यभरातील पोलिस भरती प्रक्रियेअंतर्गत लेखी परीक्षा याच दिवशी विविध केंद्रांवर आयोजित करण्यात येत असल्याने उमेदवारांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

वस्तुनिष्ठ प्रश्नांची परीक्षा

या लेखी परीक्षेत सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ (ऑब्जेक्टिव्ह) स्वरूपाचे असणार आहेत. परीक्षा दीड तासांची असणार असून उमेदवारांची ज्ञानपातळी, सामान्य ज्ञान व बौद्धिक क्षमता यांची चाचणी घेतली जाणार आहे.

आवश्यक कागदपत्रे सोबत असणे अनिवार्य

परीक्षेला येताना उमेदवारांनी खालील कागदपत्रे अनिवार्यपणे सोबत आणावीत, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

• परीक्षा हॉल तिकीट

• मैदानी चाचणीदरम्यान देण्यात आलेले ओळखपत्र

• दोन पासपोर्ट साईज फोटो

परीक्षेसाठी आवश्यक असलेले पॅड व काळ्या शाईचे पेन परीक्षा केंद्रावरूनच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

बंदी घातलेल्या वस्तूंवर कडक नजर

परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासनाने कडक नियम लागू केले आहेत. उमेदवारांना खालील वस्तू परीक्षा केंद्रात आणण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

• मोबाईल फोन

• डिजिटल डायरी

• मायक्रोफोन किंवा मायक्रो कॅमेरा

• स्मार्ट वॉच

• स्मार्ट आय-ग्लासेस

• पेन, पेन्सिल, खोडरबर इत्यादी स्वतःची लेखनसामग्री

परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यापूर्वी सर्व उमेदवारांची सखोल अंगझडती घेण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे संशयास्पद साहित्य आढळल्यास उमेदवाराला परीक्षेत बसू दिले जाणार नाही.

उशिरा येणाऱ्यांना प्रवेश नाही

परीक्षा सकाळी ११ वाजता सुरू होणार असली तरी सकाळी ८ वाजेपर्यंत केंद्रावर हजर राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. ठरलेल्या वेळेनंतर येणाऱ्या उमेदवारांना परीक्षेस बसू दिले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलिस अधिकाऱ्यांनी दिला आहे.

गैरप्रकार केल्यास कठोर कारवाई

परीक्षेदरम्यान कॉपी करणे किंवा कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार करताना उमेदवार आढळल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गास प्रतिबंध) कायदा २०२४ अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मैदानी चाचणीनंतर लेखी परीक्षेची संधी

या भरती प्रक्रियेत ११ ते १४ फेब्रुवारी दरम्यान उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली होती. त्यात यशस्वी ठरलेल्या उमेदवारांच्या गुणवत्ता यादीतून प्रत्येक पदासाठी १० उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडण्यात आले. मात्र अनेक उमेदवारांना समान गुण मिळाल्याने अतिरिक्त १५६ उमेदवारांनाही लेखी परीक्षेची संधी देण्यात आली आहे.

त्यामुळे ७३ पदांसाठी तब्बल ८८६ उमेदवारांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगणार असून पोलिस दलात प्रवेश मिळवण्यासाठी उमेदवारांची अंतिम कसोटी रविवारी होणार आहे.

The post पोलिस भरतीची लेखी परीक्षा रविवारी; उमेदवारांनी सकाळी ८ वाजताच केंद्रावर हजर राहावे ७३ पदांसाठी ८८६ उमेदवारांची चुरस; आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवण्याचे आवाहन appeared first on Satara Pratinidhi.

बायकोवर परपुरुषाचे एकतर्फी प्रेम; बदनामीच्या भीतीने सोलापुरात दाम्पत्याची आत्महत्या”सुसाईड नोटमध्ये संशयिताचे नाव; एमआयडीसी पोलिसांकडून ताबा
सोलापूर प्रतिनिधी

शहरातील एका व्यावसायिक दाम्पत्याने एकत्र विष प्राशन करून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर तपासात नवे धागेदोरे समोर आले आहेत. पत्नीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या व्यक्तीकडून सुरू असलेला छळ, वारंवार धमक्या आणि समाजात बदनामीची भीती या कारणांमुळे या दाम्पत्याने टोकाचा निर्णय घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.

सोमनाथ धानोप्पा पाटील (वय अंदाजे ३५) आणि श्रीदेवी सोमनाथ पाटील (वय अंदाजे ३०) अशी मृतांची नावे असून ते सोलापुरातील एमआयडीसी परिसरात वास्तव्यास होते. किरकोळ किराणा व्यवसायातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या दाम्पत्याला दोन लहान मुले आहेत. शुक्रवारी दुपारी दोघांनीही घरातच विषारी द्रव्य प्राशन केले. तोंडातून फेस येत असल्याचे लक्षात येताच मुलांनी नातेवाईकांना कळविले; मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला.

घटनास्थळी पोलिसांना सापडलेल्या चिठ्ठीत विजयपूर येथील अभिषेक कोरे याचे नाव स्पष्टपणे नमूद असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. संबंधित व्यक्ती श्रीदेवी पाटील यांच्यावर एकतर्फी प्रेम करत असून त्यातून तो वारंवार फोन, भेटीगाठी आणि धमक्यांद्वारे त्रास देत होता. दाम्पत्याला बदनाम करण्याचीही धमकी दिल्याचा उल्लेख चिठ्ठीत आहे. या सततच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.

चिठ्ठीतील मजकुराच्या आधारे एमआयडीसी पोलिसांनी अभिषेक कोरे याला विजयपूर येथून ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षकांनी दिली.

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून दोन चिमुकल्यांचे पालकत्व हिरावले गेल्याने शोककळा पसरली आहे.

The post बायकोवर परपुरुषाचे एकतर्फी प्रेम; बदनामीच्या भीतीने सोलापुरात दाम्पत्याची आत्महत्या”सुसाईड नोटमध्ये संशयिताचे नाव; एमआयडीसी पोलिसांकडून ताबा appeared first on Satara Pratinidhi.

डोळ्यांत अश्रू, हातात पेन; वडिलांचे पार्थिव घरात असतानाही विद्यार्थिनीने दिला दहावीचा पेपर
सोलापूर प्रतिनिधी

इयत्ता दहावीच्या परीक्षांचा ताण आणि घरातील दुःखाचा डोंगर – या दुहेरी संकटाला सामोरे जात सोलापूर जिल्ह्यातील एका विद्यार्थिनीने दाखवलेले धैर्य आणि शिक्षणाविषयीची निष्ठा मन हेलावून टाकणारी ठरली आहे. वडिलांचे पार्थिव घरात असतानाही परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतलेल्या धनश्री भिकाजी पवार हिच्या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

धनश्रीचे वडील भिकाजी पवार यांचे शुक्रवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. कुटुंबावर शोककळा पसरली. याच दिवशी धनश्रीचा दहावीचा पहिला पेपर होता. मुलीचा पेपर बुडू नये आणि तिच्या शिक्षणाविषयीचे वडिलांचे स्वप्न अपूर्ण राहू नये, या भावनेतून शाळेचे मुख्याध्यापक तानाजी माने यांनी पुढाकार घेतला.

माने स्वतः धनश्रीच्या घरी गेले. नातेवाईकांशी चर्चा करून अंत्यविधी दोन तासांनी पुढे ढकलण्याची विनंती त्यांनी मान्य करून घेतली. दुःखात खचलेल्या विद्यार्थिनीला धीर देत त्यांनी तिला परीक्षेसाठी तयार केले आणि स्वतः परीक्षा केंद्रावर नेले. परिस्थितीची माहिती शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांना देण्यात आली. जगताप यांनीही केंद्रावर येऊन विद्यार्थिनीला मानसिक आधार दिला.

मानसिक स्थिती लक्षात घेता धनश्रीला पूर्ण वेळ बसणे शक्य नव्हते. तरीही तिने दीड तास एकाग्रतेने पेपर लिहिला. त्यानंतर मुख्याध्यापक माने यांनी शाळेचे सेवक संतोष लोंढे यांच्या वाहनातून तिला अंत्यविधीसाठी घरी पोहोचवले.

वडिलांच्या निधनाच्या आघातातही शिक्षणाला प्राधान्य देण्याचा धनश्रीचा निर्णय आणि शिक्षक-प्रशासनाने दाखवलेली संवेदनशीलता यामुळे उपस्थित नातेवाईक तसेच शाळा प्रशासनाच्या डोळ्यांत अश्रू तरळले. संकटावर मात करून शिक्षणाचा ध्यास कायम ठेवणाऱ्या धनश्रीच्या धैर्याचा सर्व स्तरांतून गौरव होत असून, ती वडिलांचे स्वप्न नक्की पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

The post डोळ्यांत अश्रू, हातात पेन; वडिलांचे पार्थिव घरात असतानाही विद्यार्थिनीने दिला दहावीचा पेपर appeared first on Satara Pratinidhi.

मोहोळजवळ हॉटेलबाहेर ईव्हीएम; प्रशासनाचा खुलासा ‘राखीव मशिन्स, गैरप्रकार नाही’
सोलापूर प्रतिनिधी

जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानानंतर पुणे–सोलापूर महामार्गावर मोहोळ शहराजवळील एका हॉटेलबाहेर ईव्हीएम मशिन्स आढळून आल्याने खळबळ उडाली. मात्र या प्रकरणात कोणताही गैरप्रकार झालेला नसून संबंधित ईव्हीएम मशिन्स या राखीव (अतिरिक्त) असल्याचा खुलासा निवडणूक प्रशासनाने केला आहे. या घटनेप्रकरणी झोनल अधिकारी, त्यांचे सहाय्यक आणि वाहनचालक यांना दोषी धरत चौकशी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी दिली.

मोहोळ शहराजवळील स्वराज्य ढाब्याच्या बाहेर रात्रीच्या सुमारास काही ईव्हीएम मशिन्स ठेवण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने पोलिस प्रशासन व निवडणूक अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. या मशिन्स मोहोळ तालुक्यातील कुरुल जिल्हा परिषद गटातील असल्याचा दावा पाटील यांनी केला होता. त्यामुळे मतदानानंतर ईव्हीएम खासगी ठिकाणी कशा आढळल्या, याबाबत संशय व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, प्रशासनाकडून स्पष्टीकरण देताना उपजिल्हाधिकारी देशमुख यांनी सांगितले की, संबंधित ईव्हीएम मशिन्सवर कोणतेही मतदान झालेले नाही. या मशिन्स राखीव स्वरूपातील होत्या. झोनल अधिकाऱ्यांकडे पर्यायी वापरासाठी अशा अतिरिक्त मशिन्स दिलेल्या असतात. मात्र संबंधित अधिकारी, त्यांचे सहकारी आणि वाहनचालक यांच्यातील समन्वयाअभावी हा प्रकार घडला. गाडी थांबवून सर्वजण जेवणासाठी उतरले असताना वाहनचालकाला सर्व ईव्हीएम उतरवण्यात आल्याचा गैरसमज झाला आणि मशिन्स गाडीतच राहिल्या. ही बाब अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर ती तत्काळ प्रशासनाला कळविण्यात आली.

निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर यांनीही या घटनेला दुजोरा दिला. त्यांनी स्पष्ट केले की, मतदान झालेल्या सर्व ईव्हीएम मशिन्स सुरक्षितरीत्या स्ट्रॉगरूममध्ये जमा करण्यात आल्या असून हॉटेलबाहेर आढळलेल्या मशिन्स या पूर्णपणे राखीव होत्या. यासंदर्भातील सविस्तर अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेला गांभीर्याने घेत प्रशासनाने पंचनामा करून चौकशी सुरू केली आहे. ईव्हीएमच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे सांगत संबंधित तिघांना दोषी धरून त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचेही देशमुख यांनी स्पष्ट केले.

शनिवारी सोलापूर जिल्हा परिषदेच्या ६८ व पंचायत समितीच्या १३६ जागांसाठी सुमारे ६६ टक्के मतदान झाले आहे. निकालाबाबत उत्सुकता असतानाच ही घटना घडल्याने काही काळ संभ्रम निर्माण झाला होता. मात्र प्रशासनाच्या स्पष्टीकरणानंतर ईव्हीएम गैरप्रकाराचे आरोप निराधार ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

The post मोहोळजवळ हॉटेलबाहेर ईव्हीएम; प्रशासनाचा खुलासा  ‘राखीव मशिन्स, गैरप्रकार नाही’ appeared first on Satara Pratinidhi.

बाप की सैतान? माणुसकीला काळिमा; जुळ्या चिमुकल्यांची विहिरीत ढकलून हत्या, पाठलाग करून वडिलांच्या मुसक्या आवळल्या
सोलापूर प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील केत्तूर गावात माणुसकीला काळिमा फासणारी, काळजाचा ठाव घेणारी घटना समोर आली आहे. जन्मदात्या पित्यानेच आपल्या सहा वर्षांच्या जुळ्या मुला–मुलीला शेतातील विहिरीत ढकलून निर्दयपणे त्यांचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या घटनेमुळे संपूर्ण तालुका हादरून गेला आहे.

शिवांश जाधव आणि श्रेया जाधव अशी मृत जुळ्या भावंडांची नावे असून, सुहास जाधव (वय ३३) असे या निर्दयी वडिलांचे नाव आहे. सुहासने हिंगणी हद्दीतील आपल्या शेतात दोन्ही चिमुकल्यांना दुचाकीवर बसवून नेले आणि तेथे असलेल्या विहिरीत एकामागून एक ढकलून दिले. काही क्षणांतच दोन्ही निष्पाप जीव पाण्यात बुडून संपले.

घरच्यांना फोन, नंतर पलायनाचा प्रयत्न

प्राथमिक माहितीनुसार, घरगुती वाद किंवा मानसिक तणावातून रागाच्या भरात सुहासने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मुलांची हत्या केल्यानंतर सुहासने घरी फोन करून या कृत्याची माहिती दिली. त्यानंतर स्वतःही कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र तो दुचाकीवरून बार्शीच्या दिशेने पळून गेला.

घटनेची माहिती मिळताच करमाळा पोलिसांनी तातडीने नाकाबंदी करत पाठलाग सुरू केला. बार्शीपर्यंत आरोपीचा पाठलाग करून अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. विषबाधेचा परिणाम झाल्याने त्याला तत्काळ सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

शाळेत शोककळा

मृत शिवांश आणि श्रेया हे केत्तूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीत शिकत होते. नेहमी हसतमुख, अभ्यासात चांगली असलेली ही भावंडे अचानक कायमची हरपल्याने शाळेत शोककळा पसरली आहे. शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते.

नोकरी, शेती असूनही टोकाचा निर्णय

आरोपी सुहास जाधव हा झरे येथील ३३/११ केव्ही वीज उपकेंद्रात ऑपरेटर म्हणून कार्यरत होता. जाधव कुटुंबाकडे बागायत शेतीही असल्याची माहिती आहे. आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट नसतानाही “आपल्या पश्चात मुलांचे काय होईल” या विकृत विचारातून त्याने हे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र यामागील नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

खुनाचा गुन्हा दाखल

दरम्यान, करमाळा पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेनुसार खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सुशिक्षित आणि जबाबदार पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीने आपल्या पोटच्या मुलांवर असा अमानुष अत्याचार केल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेने समाजमन सुन्न झाले असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

The post बाप की सैतान?  माणुसकीला काळिमा; जुळ्या चिमुकल्यांची विहिरीत ढकलून हत्या, पाठलाग करून वडिलांच्या मुसक्या आवळल्या appeared first on Satara Pratinidhi.

धावत्या गाडीतचं सुरु होतं महापाप! पोलिसांनी पकडलं, दृश्य पाहून हादरले; बोगस डॉक्टर अटकेत
सोलापूर प्रतिनिधी

धावत्या कारमध्ये गर्भलिंग निदान केंद्र सुरु असल्याचा धक्कादायक आणि हादरवणारा प्रकार सोलापूरमध्ये घडला आहे. बार्शी तालुक्यामध्ये उघडकीस आलेल्या या प्रकरणात बोगस डॉक्टरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

त्याच्याकडून सर्व गर्भपाताचे साहित्य जप्त करण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

धावत्या कारमध्ये सुरु होतं महापाप…

याबाबत सविस्तर माहिती अशी की, माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना सोलापूरच्या बार्शी तालुक्यात उघडकीस आली आहे. आलिशान कारमध्ये फिरते गर्भलिंग निदान केंद्र चालवणाऱ्या एका बोगस डॉक्टरला बार्शी ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. अजित सुरेश मस्तूद असे या बोगस डॉक्टरचे नाव असून, त्याच्याकडून पोर्टेबल सोनोग्राफी मशीनसह मोठ्या प्रमाणात गर्भपाताचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

बार्शी तालुक्यातील जामगाव परिसरात एका आलिशान कारमधून बेकायदेशीर हालचाली होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून या कारची झडती घेतली असता, त्यात सुरू असलेले भयानक वास्तव समोर आले. या कारमध्ये केवळ सोनोग्राफी मशीनच नव्हती, तर गर्भपातासाठी लागणाऱ्या प्रतिबंधित गोळ्या आणि रक्ताने माखलेले वैद्यकीय साहित्यही आढळले.

बोगस डॉक्टरला अटक…

या प्रकरणी पोलिसांनी ​अजित मस्तूद याला अटक केली आहे. त्याच्यावर ‘पीएनडीटी’ (PCPNDT) कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून १८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, यामध्ये महागडी कार आणि पोर्टेबल सोनोग्राफी मशीनचा समावेश आहे. या कारवाईमुळे सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली असून, या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचे हात गुंतलेले आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.

The post धावत्या गाडीतचं सुरु होतं महापाप! पोलिसांनी पकडलं, दृश्य पाहून हादरले; बोगस डॉक्टर अटकेत appeared first on Satara Pratinidhi.

पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; सोलापुरात खळबळ
सोलापूर प्रतिनिधी

सोलापूर शहरात बुधवारी पहाटे एक धक्कादायक घटना घडली. न्यू संतोष नगर पोलिस लाईन परिसरात राहणाऱ्या एका पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अश्विनी सिलसिद्ध सलगर (वय अंदाजे ३५) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. त्या विजापूर नाका पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नी होत्या. बुधवारी पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना समोर आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी यांचे पती नाईट ड्युटीवर असल्याने त्या वेळी घरी नव्हते. घरात अश्विनी आणि त्यांची दोन लहान मुले होती. मध्यरात्री मुलं झोपलेली असताना अश्विनी यांनी त्यांच्यासोबत एक सेल्फी काढून तो जवळच्या नातेवाईकाला पाठवला तसेच फोन करून आपण जीवन संपवत असल्याची माहिती दिली. यापूर्वीही अशा स्वरूपाचे फोन येत असल्याने नातेवाईकांनी त्याकडे गंभीरतेने पाहिले नाही, अशी माहिती समोर आली आहे.

मात्र पहाटे नातेवाईकांनी मेसेज पाहिल्यानंतर त्यांनी तातडीने अश्विनी यांच्या पतीला माहिती दिली. पतीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने नातेवाईकांनी घराकडे धाव घेतली. घराचा दरवाजा आतून बंद असल्याने तो तोडून आत प्रवेश केला असता अश्विनी यांनी साडीच्या साह्याने सिलिंगच्या लोखंडी अँगलला गळफास घेतल्याचे दिसून आले.

त्यांना तातडीने खाली उतरवून सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी ज्या विजापूर नाका पोलिस ठाण्यात पती कार्यरत आहेत, त्याच ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

The post पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; सोलापुरात खळबळ appeared first on Satara Pratinidhi.

सोलापूरात तृतीयपंथी कार्यकर्त्याची हत्या; तिघांना अटक
सोलापूर प्रतिनिधी

सोलापूर शहरात घडलेल्या एका धक्कादायक हत्याकांडामुळे मोठी खळबळ उडाली असताना, शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या सहा तासांत या गुन्ह्याचा छडा लावत तिघा आरोपींना अटक केली आहे. सोन्याच्या दागिन्यांच्या लुटीसाठी तृतीयपंथी (पारलिंगी) समुदायातील सामाजिक कार्यकर्ते व आगामी महापालिका निवडणुकीचे इच्छुक उमेदवार अयुब हुसेन सय्यद यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.

सोलापूर शहरातील लष्कर परिसरात दोन दिवसांपूर्वी अयुब सय्यद यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आला होता. शरीरावर गंभीर जखमा असून घरातील साहित्य अस्ताव्यस्त अवस्थेत होते. त्यामुळे सुरुवातीपासूनच हा खून असल्याचा संशय पोलिसांना होता. घटनेची माहिती मिळताच सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अयुब सय्यद हे तृतीयपंथी समुदायातील परिचित व्यक्तिमत्त्व होते. आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी ते प्रभाग क्रमांक १६ मधून निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी प्रचाराची प्राथमिक चाचपणी सुरू केली होती. मात्र अचानक त्यांच्या मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पोलीस आयुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे हाती घेतली. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली असता संशयास्पद हालचाली टिपल्या गेल्या. या फुटेजच्या आधारे आरोपी लातूरकडे पळाल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानंतर गुन्हे शाखेची पथके तातडीने लातूरकडे रवाना झाली. विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या मदतीने संयुक्त कारवाई करत यशराज उत्तम कांबळे (वय २१), आफताब इसाक शेख (वय २४) आणि वैभव गुरुनाथ पनगुले (वय २३) या तिघांना अटक करण्यात आली.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हे तिघेही अयुब सय्यद यांच्या ओळखीचे होते. ओळखीचा फायदा घेत शुक्रवारी रात्री त्यांनी सय्यद यांच्या घरात प्रवेश केला. सोन्याचे दागिने लुटण्याच्या उद्देशाने त्यांनी खुनाचा कट रचून तिघांनी मिळून अयुब सय्यद यांची हत्या केली. या गुन्ह्याची कबुली आरोपींनी पोलिसांकडे दिली आहे.

आरोपींनी सय्यद यांच्या घरातून सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल फोन लुटला. यानंतर मयताची यामाहा दुचाकीही चोरून नेण्यात आली होती. पोलिसांनी चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

या प्रकरणी तिघा आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे करीत आहेत.

सोलापूर पोलिसांच्या वेगवान आणि अचूक तपासामुळे हा गंभीर गुन्हा अल्पावधीत उघडकीस आला असून, शहरात कायदा-सुव्यवस्थेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

The post सोलापूरात तृतीयपंथी कार्यकर्त्याची हत्या;  तिघांना अटक appeared first on Satara Pratinidhi.