कोल्हापूर Archives - Satara Pratinidhi

कोल्हापूरकरांच्या भावनिक लढ्याला यश; माधुरी हत्तीणीची नांदणीत अखेर घरवापसी
कोल्हपूर प्रतिनिधी

कोल्हापूर : ‘आमची माधुरी आम्हाला परत आणून द्या,’ अशी आर्त मागणी करणाऱ्या कोल्हापूरकरांची लाडकी माधुरी हत्तीण अखेर नांदणीत परतली. गुजरातमधील वनतारा रेस्क्यू सेंटरमध्ये देखभाल केल्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून माधुरीला तिच्या जुन्या ठिकाणी आणण्यात आले. तब्बल ४८ तासांचा प्रवास करत मुंबई आणि पुणेमार्गे माधुरी रात्री उशिरा नांदणीत दाखल झाली. तिच्या आगमनाची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात तिचे स्वागत केले. माधुरीच्या स्वागतासाठी गावात आधीपासूनच उत्साहाचे वातावरण होते. ठिकठिकाणी स्वागताचे फलक लावण्यात आले होते. तसेच वनतारा रेस्क्यू सेंटरचे संस्थापक अनंत अंबानी यांचे आभार मानणारे फलकही लावण्यात आले होते. माधुरी नांदणीत दाखल होताच कोल्हापूरकरांनी गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त केला.

माधुरीच्या पुनर्वसनासाठी नांदणीत विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तिच्या आरोग्याची काळजी घेत मोकळे वातावरण, मऊ वाळू, विशेष फ्लोअरिंग, पाण्यात व्यायाम करण्यासाठी जलाशय तसेच आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हत्तीच्या आरोग्यासाठी केवळ अन्न आणि निवारा पुरेसा नसतो. पाय व सांध्यांची नियमित तपासणी, आरोग्याचे सातत्याने निरीक्षण आणि गरजेनुसार उपचार आवश्यक असतात. त्यामुळे माधुरीच्या देखभालीसाठी आधुनिक उपचारपद्धती आणि वैद्यकीय सुविधांवर विशेष भर देण्यात येणार आहे.

माधुरीच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वनताराकडूनही आवश्यक सहकार्य करण्यात येणार आहे. वनताराच्या सहकार्यामुळे माधुरी पुन्हा नांदणीत परतत असल्याचे सांगत ग्रामस्थांनी संस्थेचे आभार मानले. माजी खासदार राजू शेट्टी यांनीही वनताराच्या भूमिकेचे कौतुक केले असून, नांदणीत ‘मिनी वनतारा’ उभारल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, माधुरीच्या देखभालीसाठी उच्चस्तरीय समितीने काही महत्त्वाच्या अटी घातल्या आहेत. माधुरीचा मिरवणूक, परेड, धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजन अथवा भीक मागण्यासाठी वापर करता येणार नाही. तसेच १८ वर्षांखालील मुलांना आणि प्रशिक्षित नसलेल्या व्यक्तींना तिच्याशी शारीरिक संपर्क करण्यास मनाई करण्यात आली आहे. वन्यजीव कायदे तसेच तज्ज्ञांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.

माधुरी ही कोल्हापूरकरांसाठी केवळ हत्तीण नसून नांदणीशी जोडलेले भावनिक नाते आहे. त्यामुळे तिची झालेली घरवापसी हा कोल्हापूरकरांसाठी आनंदाचा आणि भावनिक क्षण ठरला. तब्बल ४८ तासांचा प्रवास करून माधुरी पुन्हा आपल्या माणसांमध्ये परतल्याने नांदणीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

The post कोल्हापूरकरांच्या भावनिक लढ्याला यश; माधुरी हत्तीणीची नांदणीत अखेर घरवापसी appeared first on Satara Pratinidhi.

‘कंत्राटदार कोण, काम का रखडले?’ कागलच्या रस्त्यांवर हसन मुश्रीफांचा सवाल; सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेही नाराज
कोल्हापूर प्रतिनिधी

कोल्हापूर : कागल विधानसभा मतदारसंघातील हायब्रिड अ‍ॅन्युइटीअंतर्गत सुरू असलेल्या रस्ते विकासकामांमधील दिरंगाई आणि कामाच्या दर्जाबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही मुश्रीफ यांच्या भूमिकेशी सहमती दर्शवत प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले.

विधानसभा निवडणुकीपूर्वी हायब्रिड अ‍ॅन्युइटी योजनेअंतर्गत कागल मतदारसंघातील रणदिवेवाडी, कागल, नदीकिनारा, मुरगूड, सेनापती कापशी ते काळभैरी देवस्थानमार्गे गडहिंग्लज या ७१ किलोमीटर, तसेच बेलेवाडी हुबळगी, उत्तूर ते गडहिंग्लज या २४ किलोमीटर रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी दोन प्रमुख पॅकेज मंजूर करण्यात आले होते. मात्र, या कामांमध्ये अपेक्षित प्रगती न झाल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

या कामांसाठी नियुक्त मुख्य कंत्राटदाराने काही कामे पोटकंत्राटदारांकडे सोपविल्याचे सांगण्यात येते. त्यातच वेळेत देयके न मिळणे, कामांचा दर्जा आणि कामातील दिरंगाई यामुळे प्रश्न निर्माण झाले. याबाबत यापूर्वी अनेक बैठका होऊनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झाली नसल्याने मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.

या बैठकीत कसबा सांगाव व मौजे सांगाव येथील रस्ते, कागल शहरातील रस्ते, गटर्स व युटिलिटी शिफ्टिंग, कागल-मुरगूड मार्गावरील सिद्धनेर्ली नदीकिनारी दूधगंगा नदीवरील नवीन पूल, मुरगूड शहरातील रस्ते व गटर्स, मुरगूड-सेनापती कापशी मार्गावरील सरपिराजीराव तलावाजवळील एलिव्हेटेड पूल, आलाबाद-सेनापती कापशीदरम्यान चिकोत्रा नदीवरील नवीन पूल, तसेच सेनापती कापशी चौकातील रस्ते व सुशोभीकरण आदी कामांवर चर्चा झाली.

या सर्व कामांचे तातडीने अंदाजपत्रक तयार करून प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवावेत, तसेच प्रलंबित कामे विलंब न करता पूर्ण करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.

दरम्यान, संबंधित रस्त्यांचे काम पूर्वी कोणत्या कंत्राटदाराला देण्यात आले होते, ते काम अर्धवट का राहिले आणि त्यानंतरची निविदा प्रक्रिया का रखडली, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. निधीचा विनियोग आणि कामाच्या रखडण्यामागील कारणांबाबत प्रशासनाकडून स्पष्टता मिळणे आवश्यक असल्याची चर्चा आहे.

रस्त्यांची दुरवस्था पाहता वाहनधारक आणि नागरिकांनी केवळ खड्डे बुजविण्याऐवजी संपूर्ण रस्त्यांचे काँक्रिटीकरण करून कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली आहे. प्रलंबित कामांना गती न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

The post ‘कंत्राटदार कोण, काम का रखडले?’ कागलच्या रस्त्यांवर हसन मुश्रीफांचा सवाल; सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेही नाराज appeared first on Satara Pratinidhi.

महाराष्ट्रातील राजकीय-शैक्षणिक परिवर्तनाचा शिल्पकार हरपला; माजी राज्यपाल, शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन
कोल्हापूर प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या राजकीय, शैक्षणिक, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रावर आपल्या कार्याचा अमीट ठसा उमटवणारे ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी राज्यपाल, शिक्षणमहर्षी डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील (डॉ. डी. वाय. पाटील) यांचे मंगळवारी कोल्हापूर येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने शिक्षण क्षेत्रातील एक दूरदृष्टीचा नेतृत्वकर्ता, तर देशाने एक अनुभवी राजकारणी आणि समाजसेवक गमावला आहे.

डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाची बातमी समजताच राज्यभरातून शोक व्यक्त करण्यात आला. राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कार्याचा गौरव केला. हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारे, ग्रामीण भागातील युवकांना उच्च शिक्षणाची दारे खुली करणारे आणि शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम बनविणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख कायम राहील, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.

साध्या शेतकरी कुटुंबातून उभारले शिक्षणाचे साम्राज्य

२२ ऑक्टोबर १९३५ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील अंबाप या छोट्याशा गावात एका सामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी स्वतःचा संघर्षमय प्रवास सुरू केला. शिक्षण, समाजकारण आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रांत सातत्याने कार्य करत त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली.

त्यांनी उभारलेले शैक्षणिक विश्व आज देशातील सर्वात मोठ्या खासगी शैक्षणिक समूहांपैकी एक मानले जाते. महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांत त्यांनी वैद्यकीय, दंतवैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, कायदा, नर्सिंग, फिजिओथेरपी, कृषी, आर्किटेक्चर आणि इतर अनेक शाखांतील उच्च शिक्षण संस्था उभारल्या. पुणे, नवी मुंबई आणि कोल्हापूर येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

ग्रामीण व मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांनाही जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे, या ध्येयातून त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली. त्यांच्या संस्थांमधून आज लाखो विद्यार्थी विविध क्षेत्रांत यशस्वी कारकीर्द घडवत आहेत.

राजकारणातही ठसा उमटवला

डॉ. डी. वाय. पाटील यांची राजकीय कारकीर्दही तितकीच उल्लेखनीय ठरली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. १९५७ ते १९६२ या काळात ते कोल्हापूरचे महापौर होते. त्यानंतर १९६७ आणि १९७२ मध्ये पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले.

सामाजिक बांधिलकी, प्रशासकीय अनुभव आणि सार्वजनिक जीवनातील योगदान लक्षात घेऊन त्यांची विविध राज्यांच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. राज्यपाल म्हणूनही त्यांनी शिक्षण, विकास आणि प्रशासनातील पारदर्शकतेला प्राधान्य दिले. नंतर २०१८ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

शिक्षणाबरोबरच आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रातही मोठे योगदान

शिक्षणासोबतच आरोग्य क्षेत्रातही त्यांनी भरीव काम केले. अत्याधुनिक वैद्यकीय महाविद्यालये, बहुविशेषता रुग्णालये, संशोधन केंद्रे आणि चॅरिटेबल हॉस्पिटल्स उभारून गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

क्रीडा क्षेत्रातही त्यांचे योगदान विशेष राहिले. नवी मुंबईतील नेरुळ येथील जागतिक दर्जाचे डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम हे भारतीय क्रिकेटमधील महत्त्वाच्या स्टेडियमपैकी एक मानले जाते. येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने, आयपीएल स्पर्धा तसेच विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय क्रीडाविश्वाला आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला.

सहकार क्षेत्रातही प्रभावी नेतृत्व

कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार चळवळीतही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्याचा प्रयत्न करण्यात आला. साखर उत्पादन, ग्रामीण रोजगारनिर्मिती आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यात या कारखान्याची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली.

पुरस्कारांनी गौरवलेले कार्य

शिक्षण, समाजसेवा आणि सार्वजनिक जीवनातील उल्लेखनीय योगदानाबद्दल भारत सरकारने १९९१ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले. याशिवाय अमेरिकेतील World University Roundtable, ब्रिटनमधील Nottingham Trent University तसेच शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी त्यांना मानद डॉक्टरेट आणि डी.लिट. पदव्या प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव केला.

सामाजिक वारसा पुढे नेणारे कुटुंब

डॉ. डी. वाय. पाटील यांचा सामाजिक आणि राजकीय वारसा त्यांच्या कुटुंबीयांनीही पुढे नेला आहे. त्यांचे पुत्र सतेज (बंटी) पाटील यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री म्हणून काम पाहिले असून, डॉ. संजय डी. पाटील यांनी शैक्षणिक संस्थांच्या व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नातू ऋतुराज पाटील हेही सक्रिय राजकारणात कार्यरत आहेत.

शिक्षणविश्वासाठी मोठी पोकळी

शून्यातून विश्व निर्माण करण्याची क्षमता, दूरदृष्टी, सामाजिक बांधिलकी आणि शिक्षणाला विकासाचे सर्वात प्रभावी साधन मानणारी विचारसरणी यामुळे डॉ. डी. वाय. पाटील यांचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने केवळ एका शिक्षणसंस्थेच्या संस्थापकाचा नव्हे, तर लाखो विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देणाऱ्या एका युगपुरुषाचा अंत झाला आहे. शिक्षण, आरोग्य, क्रीडा, सहकार आणि समाजसेवा या सर्व क्षेत्रांतील त्यांचे योगदान भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

The post महाराष्ट्रातील राजकीय-शैक्षणिक परिवर्तनाचा शिल्पकार हरपला; माजी राज्यपाल, शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन appeared first on Satara Pratinidhi.

पैशांसाठी छळ, मुलगा जन्माला न आल्याची खंत?; बारशाच्या तयारीत असतानाच महिनाभराच्या मुलीच्या आईची आत्महत्या, सासरच्यांवर गंभीर आरोप
कोल्हापूर प्रतिनिधी

कोल्हापूर शहरातील राजारामपुरी परिसरात एका महिन्याच्या मुलीच्या बारशाची तयारी सुरू असतानाच तिच्या आईने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृत विवाहितेच्या माहेरच्यांनी सासरच्या कुटुंबीयांवर हुंड्यासाठी छळ, पैशांची मागणी आणि मुलगा न झाल्यामुळे मानसिक त्रास दिल्याचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपासाला गती दिली असून, घटनेचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजारामपुरी परिसरात राहणाऱ्या अस्मिता (पूर्ण नाव जाहीर करण्यात आलेले नाही) यांनी रविवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे अवघ्या महिनाभरापूर्वीच त्यांनी एका मुलीला जन्म दिला होता. १५ ऑगस्ट रोजी मुलीच्या बारशाचा कार्यक्रम करण्याचे नियोजन सुरू असतानाच ही घटना घडल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

माहेरच्यांचे गंभीर आरोप

अस्मिताच्या आईने माध्यमांशी बोलताना सांगितले की, लग्नानंतरपासूनच तिचा पैशांसाठी सातत्याने छळ करण्यात येत होता. रोख रक्कम तसेच ऑनलाइन पद्धतीनेही पैशांची मागणी केली जात होती. मुलगा व्हावा, अशी सासरच्या मंडळींची अपेक्षा होती. मात्र मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्याशी वागण्याची पद्धत बदलली आणि मानसिक त्रास अधिक वाढला, असा आरोप त्यांनी केला.

त्यांच्या म्हणण्यानुसार, बाळाचा जन्म होण्यापूर्वीच मुलगा होईल या अपेक्षेने मुलांचे कपडे खरेदी करण्यात आले होते. “वंशाला दिवा हवा” या मानसिकतेतून मुलगी झाल्याने अस्मिताला टोमणे मारले जात होते, असा आरोपही त्यांनी केला.

बारशासाठी ५२ हजार रुपयांचा पाळणा

माहेरच्या नातेवाईकांनी आणखी एक गंभीर दावा करताना सांगितले की, मुलीच्या बारशासाठी सुमारे ५२ हजार रुपयांचा पाळणा ऑनलाइन मागविण्यात आला होता. या कार्यक्रमाचा सर्व खर्च माहेरकडून करण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. यापूर्वीही विविध कारणांनी आर्थिक मागण्या करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

अस्मिताच्या वडिलांनी सांगितले की, “शुक्रवारी तिच्याशी शेवटचे बोलणे झाले. त्यावेळी बारसा मोठ्या प्रमाणात करण्याबाबत सासरच्या मंडळींकडून आग्रह असल्याचे तिने सांगितले होते. प्रसूतीचा खर्च, अधिक मासातील धार्मिक कार्यक्रम यामुळे आमच्यावर आधीच आर्थिक ताण होता. तरीही मोठा समारंभ करण्यासाठी दबाव टाकला जात होता.”

सासरच्या चौघांविरोधात आरोप

या प्रकरणात अस्मिताच्या आई-वडिलांनी तिचा पती, सासू, सासरे आणि नणंद यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या छळामुळेच अस्मिताने टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा त्यांनी केला असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पोलिसांचा तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. न्यायालयीन प्रक्रियेनुसार पुढील तपास सुरू असून, मृत्यूमागील नेमके कारण, कौटुंबिक वाद, आर्थिक व्यवहार तसेच माहेरच्यांनी केलेल्या आरोपांची पडताळणी केली जात आहे. संबंधितांचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून, तपासाच्या निष्कर्षानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

समाजासमोर पुन्हा उभे राहिलेले प्रश्न

या घटनेने मुलगा-मुलगी भेदभाव, हुंडा व आर्थिक अपेक्षा, तसेच विवाहित महिलांवरील मानसिक छळ या गंभीर सामाजिक प्रश्नांकडे पुन्हा लक्ष वेधले आहे. मुली सर्वच क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत असतानाही “वंशाचा दिवा” या जुनाट मानसिकतेतून महिलांवर होणारा दबाव आणि त्याचे भीषण परिणाम यावर समाजाने गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे.

The post पैशांसाठी छळ, मुलगा जन्माला न आल्याची खंत?; बारशाच्या तयारीत असतानाच महिनाभराच्या मुलीच्या आईची आत्महत्या, सासरच्यांवर गंभीर आरोप appeared first on Satara Pratinidhi.

कोल्हापूर हादरलं! पत्नी वकिलाला भेटायला गेली अन् पतीने रचला सापळा; भररस्त्यात कोयत्याने सपासप वार करत संपवलं जीवन
कोल्हापूर प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव येथे बुधवारी संध्याकाळी घडलेल्या एका हृदयद्रावक आणि संतापजनक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. चारित्र्याच्या संशयातून एका पतीने आपल्या पत्नीवर भररस्त्यात धारदार कोयत्याने सपासप वार करत तिची निर्घृण हत्या केली. शेकडो नागरिकांच्या डोळ्यांसमोर हा रक्तरंजित प्रकार घडला. नागरिकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने हातातील रक्ताळलेला कोयता दाखवत धमकावले आणि “हे आमचं अंतर्गत प्रकरण आहे, कोणीही मध्ये पडू नका,” अशी गर्जना केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मृत महिलेचे नाव अमृता दीपक कांबळे (वय ३०) असे असून, आरोपी दीपक कांबळे (वय ३५) याला पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेत अटक केली आहे. हत्येनंतर “विषय संपवला” असे ओरडत मिशीवर ताव मारत आरोपीने दाखवलेली निर्ढावलेली वृत्ती पाहून उपस्थित नागरिकही हादरले.

हत्येपूर्वी मोबाईलवर ठेवले धक्कादायक स्टेटस

या हत्येपूर्वी आरोपी दीपकने आपल्या मोबाईलवर एक धक्कादायक स्टेटस ठेवले होते. “आज माझा तरी शेवट… नाही तर पुढच्याचा” अशा आशयाचे स्टेटस त्याने सोशल मीडियावर अपलोड केल्याची माहिती समोर आली आहे. या स्टेटसमुळे आरोपीने हत्येचे नियोजन आधीच केले होते का, या दृष्टीनेही पोलिस तपास करत आहेत.

प्रेमविवाहानंतर संसारात संशयाचे सावट

दीपक आणि अमृता यांनी सुमारे आठ वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. या दाम्पत्याला दोन लहान मुली आहेत. सुरुवातीला त्यांचा संसार सुरळीत सुरू होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून दीपक पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला होता. या कारणावरून दोघांमध्ये सातत्याने वाद होत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. कौटुंबिक कलह वाढल्यानंतर अमृता यांनी कायदेशीर सल्ला घेण्याचा निर्णय घेतला होता.

वकिलाला भेटण्यासाठी गेली अन् बाहेरच दबा धरून बसला पती

बुधवारी संध्याकाळी अमृता पेठवडगाव येथील एका व्यावसायिक संकुलात वकिलांची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या. याची माहिती मिळताच दीपक धारदार कोयता घेऊन त्या परिसरात आधीच दबा धरून बसला. अमृता बाहेर येताच त्याने त्यांना अडवले. दोघांमध्ये काही वेळ शाब्दिक वाद झाला आणि क्षणार्धात त्याचे रूप भीषण हल्ल्यात झाले.

भररस्त्यात सपासप वार; मदतीला धावलेल्यांनाही धमकावले

रागाच्या भरात दीपकने अमृता यांच्यावर कोयत्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली. गंभीर जखमी झालेल्या अमृता रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या आणि मदतीसाठी आर्त हाका मारू लागल्या. परिसरातील नागरिक धावत घटनास्थळी पोहोचले. काही तरुणांनी आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र दीपकने हातातील रक्ताळलेला कोयता फिरवत, “ती माझी पत्नी आहे… हे आमचं अंतर्गत मॅटर आहे… कोणीही मध्ये पडू नका,” अशी धमकी दिली. त्यामुळे काही काळ नागरिकही भयभीत झाले.

त्यानंतर आरोपीने पुन्हा अमृता यांच्यावर वार केले. गंभीर दुखापतीमुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. भररस्त्यात घडलेल्या या थरारक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

पोलिसांची तातडीने कारवाई

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी दीपक कांबळेला ताब्यात घेतले. हत्येसाठी वापरण्यात आलेला कोयताही जप्त करण्यात आला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हत्येमागील नेमके कारण, पूर्वनियोजन होते का, तसेच मोबाईलवरील स्टेटससह इतर डिजिटल पुराव्यांची तपासणी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

परिसरात हळहळ; दोन चिमुकल्या मुलींच्या भवितव्याची चिंता

या घटनेमुळे पेठवडगाव परिसरात शोककळा पसरली आहे. प्रेमविवाह करून संसार थाटलेल्या या दाम्पत्याचा शेवट एवढ्या भीषण स्वरूपात होईल, याची कुणालाही कल्पना नव्हती, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली. या घटनेत दोन निष्पाप मुलींच्या डोक्यावरून आईचे छत्र हरपल्याने नागरिकांनी तीव्र हळहळ व्यक्त केली आहे.

दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा कौटुंबिक हिंसाचार, महिलांची सुरक्षितता आणि चारित्र्याच्या संशयातून घडणाऱ्या गुन्ह्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, अशा प्रकरणांमध्ये वेळेत समुपदेशन आणि कायदेशीर हस्तक्षेपाची गरज आहे.

The post कोल्हापूर हादरलं! पत्नी वकिलाला भेटायला गेली अन् पतीने रचला सापळा; भररस्त्यात कोयत्याने सपासप वार करत संपवलं जीवन appeared first on Satara Pratinidhi.

कोल्हापूरवर पावसाचा जोर कायम! २१ बंधारे जलमय; पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
कोल्हापूर प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्यात जुलैच्या सुरुवातीलाच पावसाने जोरदार हजेरी लावली असून घाटमाथ्यासह धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून तब्बल २१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील तीन दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे.

४ जुलैअखेर जिल्ह्यात एकूण ४७६.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ४९.५ मिलिमीटर पाऊस झाला. शनिवारी गगनबावडा, शाहूवाडी आणि पन्हाळा या घाटमाथ्यावरील तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे.

पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यावर शनिवारी रात्री सुमारे २६ फूट पाणीपातळीची नोंद झाली. नदीची इशारा पातळी ३९ फूट तर धोका पातळी ४३ फूट असल्याने सध्या पाणीपातळी धोक्यापासून दूर असली तरी सतत सुरू असलेल्या पावसामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. राजाराम बंधाऱ्यातून सुमारे १९ हजार ५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

धरणक्षेत्रात चार दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे घटप्रभा धरण पूर्ण क्षमतेने भरले असून त्याच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. फाटकवाडी मध्यम प्रकल्पही भरल्याने तेथूनही पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जूनअखेर कोरड्या पडलेल्या पंचगंगेसह इतर नद्या आता दुथडी भरून वाहत असून पंचगंगा नदीपात्रातील काही मंदिरेही पाण्याखाली गेली आहेत.

जिल्ह्यातील २१ बंधारे पाण्याखाली गेल्याने नदीकाठच्या भागातील संपर्क मार्गांवर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली असून प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि नदी-नाल्यांजवळ जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढू शकतो तसेच नद्यांची पाणीपातळी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवत परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले आहे.

तालुकानिहाय पावसाची नोंद (मि.मी.)

– गगनबावडा – १०२

– शाहूवाडी – ७९.७

– राधानगरी – ६६.४

– आजरा – ६२

– पन्हाळा – ५४.३

– करवीर – ५२.५

– भुदरगड – ४६.४

– कागल – ४५.३

– चंदगड – ४४.३

– गडहिंग्लज – ४१.६

– हातकणंगले – २९

– शिरोळ – १८.४

The post कोल्हापूरवर पावसाचा जोर कायम! २१ बंधारे जलमय; पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा appeared first on Satara Pratinidhi.

कौटुंबिक वादातून पत्नीची विळ्याने हत्या; गडहिंग्लज तालुक्यातील नूल गाव हादरले
कोल्हापूर प्रतिनिधी

गडहिंग्लज तालुक्यातील नूल येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर विळ्याने सपासप वार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी पतीला काही तासांतच ताब्यात घेतले आहे. मृत महिलेचे नाव चित्रांजली भीमाप्पा चितारी (वय ३८) असे असून, आरोपी पती भीमाप्पा चंद्राप्पा चितारी (वय ४५) याच्याविरुद्ध गडहिंग्लज पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चितारी दाम्पत्य नूल गावात वास्तव्यास असून भीमाप्पा चितारी हे शेती, दुग्धव्यवसाय तसेच फॅब्रिकेशनचा व्यवसाय करतात. त्यांचा मुलगा आणि मुलगी शिक्षणासाठी बाहेरगावी राहत असल्याने पती-पत्नी दोघेच घरी होते. गेल्या काही काळापासून दोघांमध्ये घरगुती कारणांवरून वारंवार वाद होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

रविवारी रात्री घरासमोर दोघांमध्ये पुन्हा जोरदार बाचाबाची झाली. या वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले. संतापाच्या भरात भीमाप्पा चितारी यांनी घरातील धारदार विळा उचलून पत्नी चित्रांजली यांच्या मानेवर, खांद्यावर आणि हातावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या चित्रांजली या रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर कोसळल्या. त्यांच्या आरडाओरड्याने परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले; मात्र तोपर्यंत त्या गंभीर जखमी झाल्या होत्या.

घटनेनंतर आरोपी भीमाप्पा हा जवळील ऊसाच्या शेतात जाऊन लपून बसला. दरम्यान, ग्रामस्थांनी तातडीने पोलीस पाटील परशुराम सरनाईक यांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले आणि पोलीस उपनिरीक्षक रमेश मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर पोलिसांनी परिसरात शोधमोहीम राबवत आरोपीला ऊसाच्या शेतातून ताब्यात घेतले.

पोलीस पाटील परशुराम सरनाईक यांच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीची चौकशी सुरू आहे. घटनेमागील नेमके कारण आणि दाम्पत्यातील वादाचे स्वरूप याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

अंधारामुळे सुरुवातीला दुर्लक्ष

घटना घडली त्या वेळी गावातील वीजपुरवठा खंडित झाल्याने परिसरात अंधार होता. चितारी दाम्पत्यामध्ये नेहमीच वाद होत असल्याने सुरुवातीला शेजाऱ्यांनी या आरडाओरड्याकडे फारसे लक्ष दिले नाही. मात्र काही वेळाने संशय आल्याने नागरिक घटनास्थळी पोहोचले असता चित्रांजली या गंभीर अवस्थेत पडलेल्या दिसून आल्या. त्यावेळी त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

कुटुंबावर दुःखाचा डोंगर

चित्रांजली चितारी यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सासू आणि नणंद असा परिवार आहे. एका क्षणाच्या संतापातून घडलेल्या या घटनेमुळे नूल गावासह संपूर्ण सीमाभागात हळहळ व्यक्त होत असून, कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

The post कौटुंबिक वादातून पत्नीची विळ्याने हत्या; गडहिंग्लज तालुक्यातील नूल गाव हादरले appeared first on Satara Pratinidhi.

‘आता शिवसेना एकच राहिली आहे’; अमित शाहांचा कोल्हापुरातून सूचक टोला, शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ची अप्रत्यक्ष दखल
कोल्हापूर प्रतिनिधी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर विकास आराखड्याच्या भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमात उपस्थित राहून राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर सूचक भाष्य केले. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेताना काही क्षण थांबून स्मितहास्य केले. त्यानंतर त्यांनी केलेल्या वक्तव्याने उपस्थितांमध्ये एकच चर्चा रंगली.

“शिवसेनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,” असा उल्लेख करत शाह म्हणाले, “पूर्वी एकनाथ शिंदे यांच्याबाबत बोलताना शिवसेना शिंदे गट असे म्हणावे लागत होते. मात्र आता कोणताही गट उरलेला नाही. आता शिवसेना एकच राहिली आहे.” शाह यांच्या या वक्तव्याकडे शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहिमेची अप्रत्यक्ष दखल म्हणून पाहिले जात आहे.

‘ऑपरेशन टायगर’ची राष्ट्रीय पातळीवर चर्चा

गेल्या काही दिवसांत राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून देणाऱ्या ‘ऑपरेशन टायगर’अंतर्गत ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केल्याची चर्चा आहे. यामध्ये संजय दिना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, नागेश आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि ओमराजे निंबाळकर यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, या खासदारांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयात जाऊन स्वतंत्र गटनोंदणीसंदर्भातील प्रक्रिया पूर्ण केली. मात्र काही तांत्रिक बाबींची पूर्तता बाकी असल्यामुळे या खासदारांच्या शिंदे गटातील प्रवेशाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. ओमराजे निंबाळकर वगळता इतर पाच खासदार राजस्थानमधील अज्ञातस्थळी असल्याची माहिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

अंबाबाई मंदिरासाठी १५०० कोटींचा विकास आराखडा

राजकीय भाष्याबरोबरच अमित शाह यांनी कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर विकास प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले. “देशभरातील भाविकांचे स्वागत करण्यासाठी अंबाबाई मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी १५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून मंदिर परिसरात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील,” असे शाह यांनी सांगितले.

राम मंदिरापासून वारसा संवर्धनापर्यंत मोदी सरकारचा उल्लेख

भाषणादरम्यान शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा उल्लेख केला. “आम्ही लहानपणापासून अयोध्येतील राम मंदिराबाबत ऐकत होतो. मात्र ते प्रत्यक्षात उभे राहील की नाही, याबाबत शंका होती. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राम मंदिराचे स्वप्न साकार झाले,” असे ते म्हणाले.

“विकास आणि विरासत या दोन सूत्रांवर मोदी सरकार काम करत आहे. देशातील सांस्कृतिक वारसा जपत विकासाला गती देण्याचे काम सुरू आहे,” असेही शाह यांनी नमूद केले.

घुसखोरीवर कठोर भूमिका

देशातील राजकीय परिस्थितीचा उल्लेख करताना शाह यांनी पश्चिम बंगालचाही संदर्भ दिला. “एकेकाळी भाजप बंगालमध्ये पोहोचू शकणार नाही, असे म्हटले जात होते. मात्र बंगालच्या जनतेने मोठा पाठिंबा दिला. देशात कुठल्याही मार्गाने घुसखोरी होऊ देणार नाही, ही आमची भूमिका कायम आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर केंद्र सरकारची भूमिका पुन्हा अधोरेखित केली.

कोल्हापुरातील धार्मिक विकासाच्या कार्यक्रमात केलेल्या अमित शाह यांच्या भाषणात विकासकामांबरोबरच महाराष्ट्रातील सत्तासमीकरणे आणि शिवसेनेतील अलीकडील राजकीय घडामोडींचेही स्पष्ट प्रतिबिंब उमटल्याचे पाहायला मिळाले. विशेषतः “आता शिवसेना एकच राहिली आहे” या त्यांच्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

The post ‘आता शिवसेना एकच राहिली आहे’; अमित शाहांचा कोल्हापुरातून सूचक टोला, शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ची अप्रत्यक्ष दखल appeared first on Satara Pratinidhi.

अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्याची जय्यत तयारी; प्रशासन युद्धपातळीवर, पोलीस परेड ग्राऊंडवर भव्य सभेची रंगीत तालीम
कोल्हापूर प्रतिनिधी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे उद्या शुक्रवार (१९ जून) आणि शनिवार (२० जून) रोजी दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर येत असून त्यांच्या स्वागतासाठी आणि दौऱ्याच्या सुरळीत आयोजनासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि कोल्हापूर महापालिकेने युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख मार्गांची दुरुस्ती, स्वच्छता, अतिक्रमण निर्मूलन, सुरक्षा व्यवस्थेची उभारणी आणि विविध नागरी सुविधांची पाहणी याला वेग आला आहे.

केंद्रीय गृहमंत्र्यांचा दौरा केवळ राजकीयदृष्ट्याच नव्हे, तर प्रशासकीयदृष्ट्याही महत्त्वाचा मानला जात असल्याने शहरातील सर्व प्रमुख विभागांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभागांकडून कामांचा आढावा घेतला जात असून नियोजनबद्ध पद्धतीने तयारी पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.

दौऱ्यादरम्यान गृहमंत्री अमित शहा यांचा ताफा ज्या मार्गाने जाणार आहे, त्या मार्गांवरील रस्त्यांची डागडुजी आणि पॅचवर्कची कामे तातडीने पूर्ण करण्यात येत आहेत. सर्किट हाऊस, शाहू टोल नाका, धैर्यप्रसाद चौक, खानविलकर पेट्रोल पंप परिसर तसेच करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील रस्त्यांची विशेष दुरुस्ती करण्यात येत आहे. याशिवाय रस्त्यालगत असलेल्या धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी, ड्रेनेज व्यवस्थेची साफसफाई, डीप क्लिनिंग आणि सार्वजनिक स्वच्छतेच्या मोहिमा हाती घेण्यात आल्या आहेत.

शहरातील सौंदर्यीकरण आणि वाहतुकीत अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवरही प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. महालक्ष्मी मंदिर परिसर, विद्यापीठ प्रवेशद्वार, भवानी मंदिर चौक, शहाजी कॉलेज ते दसरा चौक आणि केएसबीपी चौक मार्गावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत. दौऱ्याच्या मार्गावरील सर्व खोदकामे तातडीने पूर्ण करून रस्ते पूर्ववत करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.

सुरक्षेच्या दृष्टीनेही व्यापक उपाययोजना करण्यात येत आहेत. गृहमंत्र्यांच्या ताफ्याच्या मार्गावर ठिकठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात येत असून पोलीस यंत्रणेकडून सुरक्षा आराखडा अंतिम करण्यात येत आहे. भटकी जनावरे आणि कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून आवश्यक ठिकाणी मोबाईल शौचालयांची व्यवस्था करण्यात येत आहे. अग्निशमन विभागालाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, शहरातील पोलीस परेड ग्राऊंडवर अमित शहा यांच्या प्रमुख सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला भाजप व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सभेदरम्यान गृहमंत्री शहा यांचा नागरी सत्कारही करण्यात येणार असून त्यासाठी भव्य व्यासपीठ उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. मंडप, बैठक व्यवस्था, ध्वनीप्रणाली आणि सुरक्षा व्यवस्थेची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील या दौऱ्याला आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्व प्राप्त झाले असून प्रशासनाकडून कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी सर्व विभागांमध्ये समन्वय साधला जात आहे. शहरात सुरू असलेल्या कामांमुळे आगामी दोन दिवस कोल्हापूरचे लक्ष केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दौऱ्याकडे लागले आहे.

The post अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्याची जय्यत तयारी; प्रशासन युद्धपातळीवर, पोलीस परेड ग्राऊंडवर भव्य सभेची रंगीत तालीम appeared first on Satara Pratinidhi.

कोल्हापूरचे माजी उपअधीक्षक तुषार पाटील यांचे निधन; वडिलांनी दिलेल्या किडनीच्या बळावर आठ वर्षे संघर्ष, रक्ताच्या उलटीनंतर प्रकृती खालावली
कोल्हापूर प्रतिनिधी

कोल्हापूर शहराचे माजी पोलिस उपअधीक्षक तथा राज्य राखीव पोलिस बल (एसआरपीएफ) गट क्रमांक ५, दौंडचे समादेशक अपर पोलिस अधीक्षक तुषार प्रभाकर पाटील (वय ४५) यांचे शनिवारी (७ जून) पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. कर्तव्यदक्ष, अभ्यासू आणि संवेदनशील अधिकारी म्हणून ओळख असलेल्या पाटील यांच्या अकाली निधनाने पोलिस दलासह प्रशासकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.

गेल्या काही वर्षांपासून ते मूत्रपिंडाच्या आजाराशी झुंज देत होते. सुमारे आठ वर्षांपूर्वी त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. विशेष म्हणजे, त्यांच्या वडिलांनी स्वतःची किडनी दान करून मुलाला नवजीवन दिले होते. प्रत्यारोपणानंतरही त्यांनी सेवेत सक्रिय राहून विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या होत्या.

मात्र, दोन दिवसांपूर्वी अचानक रक्ताची उलटी झाल्याने त्यांना तातडीने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती गंभीर बनली आणि ते कोमात गेले. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही त्यांना वाचवता आले नाही. शनिवारी सकाळी उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

कोल्हापूरशी जुळलेले विशेष नाते

पाटील यांनी परिविक्षाधीन कालावधी पूर्ण केल्यानंतर २००४ मध्ये कोल्हापूर शहर पोलिस उपअधीक्षक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यांच्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच नागरिकांशी सुसंवाद साधणारे अधिकारी अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली होती.

यानंतर त्यांनी रत्नागिरी येथे अपर पोलिस अधीक्षक म्हणून काम पाहिले. विविध संवेदनशील पदांवर काम करताना त्यांनी प्रशासकीय कौशल्य आणि नेतृत्वगुणांची छाप पाडली. काही महिन्यांपूर्वी ते नागरी हक्क संरक्षण विभागात (पीसीआर) अधीक्षक म्हणून कोल्हापुरात रुजू झाले होते. त्यानंतर सहा महिन्यांपूर्वी त्यांची दौंड येथे एसआरपीएफ गट क्रमांक ५ च्या समादेशकपदी बदली झाली होती.

त्यांच्या पत्नी शिल्पा नाईक या कोल्हापूर महानगरपालिकेत सहायक आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. त्यामुळे पाटील कुटुंबाचा कोल्हापूरशी विशेष संबंध राहिला.

पोलिस दलात शोककळा

तुषार पाटील यांच्या निधनाची बातमी समजताच पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये शोककळा पसरली. कर्तव्यनिष्ठ आणि मनमिळावू अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. अनेकांनी सामाजिक माध्यमांद्वारे तसेच प्रत्यक्ष भेटून श्रद्धांजली अर्पण केली.

त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी शिल्पा आणि मुलगा संकेत असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

तुषार पाटील यांच्यावर सोमवारी (८ जून) सकाळी त्यांच्या मूळ गावी जामनेर (जि. जळगाव) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी, सहकारी आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना अखेरचा निरोप दिला.

कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य देणारा अधिकारी, गंभीर आजाराशी धैर्याने सामना करणारा योद्धा आणि कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व अशी ओळख असलेले तुषार पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्र पोलिस दलाने एक सक्षम अधिकारी गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

The post कोल्हापूरचे माजी उपअधीक्षक तुषार पाटील यांचे निधन; वडिलांनी दिलेल्या किडनीच्या बळावर आठ वर्षे संघर्ष, रक्ताच्या उलटीनंतर प्रकृती खालावली appeared first on Satara Pratinidhi.