
वार्ताहर -स्वप्नील गाडे
वांद्रे पूर्व येथे पहाटे ३:४५ वाजता महाराष्ट्र नगर मधील टायटानिक इमारतीच्या मिटररूम मध्ये शॉर्टसर्किट झाल्या मुले आग लागली.अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण करून आग विजवण्यात अली.या प्रकरणाची माहिती मिळताच विभागप्रमुख कुणाल सरमळकर घटनास्थळी येऊन पहाणी करून स्थानिक रहिवाशांना सहकार्य केले
वांद्रे पूर्व महाराष्ट्र नगर परिसरातील टायटानीक इमारती मधील मिटररूम मध्ये पहाटे ३:४५ वाजताच्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्याने मिटररूमला आग लागली.स्थानिकांनी खेरवाडी पोलीस ठाणे व अग्निशमन दलाला संपर्क केला.अग्निशमन दलाच्या ३गाड्या घटनास्थळी येऊन आगीवर नियंत्रण करून आग विजवण्यात आली.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झालीनसून आग लागल्या मुळे इमारतीचा पूर्ण विधुतपुरवठा बंद झाला आहे.या घटनेची माहिती मिळताच स्थानिक विभागप्रमुख कुणाल सरमळकर हे घटनास्थळी येऊन पहाणी करून अदानी इलेक्ट्रिसिटी च्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून लवकरात लवकर टायटानीक इमारतीचा विधुतपुरवठा पुन्हा सुरळीत सुरू करून दयावा अशे आदेश कुणाल सरमळकर यांनी अदानी इलेक्ट्रिसिटीच्या अधिकाऱ्यांना दिले.यावेळी सरमळकर यांनी लोकांची विचारपूस करून इमारती मधील स्थानिक रहिवाशांना दुसऱ्याच दिवशी पुन्हा विधुतपुरवठा सुरू करून देतो असे आश्वासन दिले.