
पुणे प्रतिनिधी
पुणे-बंगळूर महामार्गावरील येथील कोयना नदीवरील नवीन पुलाचे काम जपानच्या अद्ययावत तंत्रज्ञानाने सुरू आहे. पुलाला मजबूत करणाऱ्या व रस्त्याला जोडण्याचा विस्तार जपानच्या तंत्रज्ञानाने बदलण्यात येत आहे.
टोकियोमध्ये तयार झालेली अत्याधुनिक सामग्री त्यासाठी वापरली जात आहे. जपानचे तंत्रज्ञान देशात पहिल्यांदाच येथे वापरली जात आहे. त्यामुळे पुलाचे सरासरी आयुर्मान ५० वर्षांनी वाढणार आहे.
कोयना पुलावरील रस्ता अखंड नाही. तो दोन ठिकाणी जोडला आहे. त्यासाठी ते जोडले गेलेले भाग ठराविक वर्षाने बदलेले जातात. भारतीय बनावटीचे साहित्य यापूर्वी बसवले जात होते. ते किमान १५ वर्षांनी तपासणी करून कधी बदलायचे ते ठरवेल जात होते. ती प्रणाली आता जपानची वापरली जात आहे. जपानमध्ये तयार झालेली मजबूत सामग्री तेथे बसवली जात आहे. डीपी जैन, मुंबईची जेईई इंजिनिअरिंग कार्पोरेशन व जपानच्या शु-बॉण्ड कंपनीतर्फे त्याचे काम सुरू आहे.
कोयना पुलावर रस्ता दोन वेगवेगळ्या ठिकाणी जोडला आहे. तो जोड बदलला जाणार आहे. त्यासाठी पूर्वीचा जोडलेला रस्ता पूर्णपणे काढून तेथे नव्या तंत्रज्ञानाचा विस्तारित जोड वापरला जाणार आहेत. पूर्वीचा जोड काढून तेथील जागा मोकळी केली जाईल. त्यानंतर जपानमध्ये तयार एक्सापशन जॉइंट तेथे बसवले जातील. पुलाला मजबूत होणार आहे. त्याशिवाय पुलाचे आयुर्मान सरासरी ५० वर्षांनी वाढणार आहे. वारुंजी गावाला जाणाऱ्या बाजूला पुलावर ते सुरू आहे.
पुणे-बंगळूर महामार्गावरील कोयना पुलावरून मोठी वाहतूक होत असते. २००५ मध्ये महामार्गाचे चौपदरीकरण झाले. त्यावेळी कोयना नदीवर नवा पूल झाला. त्या वेळी त्याचे आयुर्मान सरासरी ७० वर्षांचे आहे, असे जाहीर केले होते. पुलावरून दररोज किमान चार हजार अवजड वाहने धावतात. त्यामुळे पुलाच्या मजबुतीकरणाला प्राधान्य दिले जाते. तब्बल १५ वर्षांनी पुलावरील रस्ता व तो जेथे जोडला आहे. त्याची तपासणी केली जाते.
जपानच्या शु-बॉण्ड कंपनीचे तीन अधिकारी, कर्मचारी येथे प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी आहेत. त्या रस्त्याला जोडला जाणारा भाग बदलण्यास तीन दिवस लागणार आहेत. त्यामुळे पुलावरील वाहतूकही वळवली आहे.
पुलावरील रस्ता जोडण्यासाठी जपानहून शु-बॉण्ड कंपनीचे इजुमी सुबायाशी मुख्य अधिकारी येथे आले आहेत. हिराकी व कोयाबसी त्यांचे सहकारी व डीपी जैनतर्फे सरव्यवस्थापक इम्रान बिरादार, अजित घारे व राजेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू आहे.
पुलांना दिलेले जॉइंट सरासरी आयुर्मानचा विचार करून बदलण्याची प्रक्रिया केली जाते. नवीन कोयना पुलाचे जॉइंट येथेही बदलले जात आहेत. जपानच्या शु-बॉण्ड नामांकित कंपनीने तयार कलेले अत्याधुनिक पद्धतीची सामग्री वापरून येथे काम होणार आहे. त्यामुळे कितीही अवजड वाहन गेले तरी त्याचा फरक पडणार नाही. पुलाचे आयुर्मानही किमान ५० वर्षांनी वाढते आहे.असे डीपी जैन कंपनीचे सरव्यवस्थापक इम्रान बिरादार यांनी सांगितले.