
सातारा प्रतिनिधी News नेटवर्क.
मुंबई- स्वतःच्या सतरा वर्षीय मुलीवर गेले पाच वर्षांपासून लैगिंक अत्याचार करणाऱ्या बापाला क्राईम ब्रँच युनिट-३ च्या पथकांनी अटक करून पुढील तपासा साठी ताडदेव पोलिसांच्या ताब्यात दिले.
महालक्ष्मी परिसरात राहणारी 17 वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी ताडदेव पोलिसांत दिली. दरम्यान, गुन्हे शाखा युनिट-3 चे प्रभारी निरीक्षक सदानंद येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि समीर मुजावर, उपनिरीक्षक राणे, गोरेगावकर, तसेच घाटकर, परब, जगताप, चव्हाण, ठापूर, हर्षला पाटील या पथकाने मुलीचा शोध सुरू केला. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मुलगी महालक्ष्मी रेल्वे स्थानकात असल्याचे कळताच पथकाने स्थानक गाठून मुलीला ताब्यात घेतले. तिला युनिट कार्यालयात नेऊन चौकशी केली असता तिने घर सोडून पळून गेल्याचे सांगितले. वडील गेल्या पाच वर्षांपासून लैंगिक शोषण करत असल्याचे मुलीने सांगताच पोलिसांनी मुलीच्या बापाला पकडून ताडदेव पोलिसांच्या ताब्यात दिले.
मित्राने नकार दिल्याने परतली
वडिलांच्या लैंगिक अत्याचाराला वैतागून मी मित्रांकडे ठाण्याला गेली. पण त्याने सोबत राहायला नकार दिला. त्यामुळे पुन्हा महालक्ष्मीला आले असे मुलीने सांगितले. मुलीने वडील लैंगिक शोषण करतानाचा व्हिडीओ वडिलांच्या मोबाईलमध्ये गुपचूप चित्रित केला व तो व्यवस्थित लपवून ठेवला होता. तो व्हिडीओच समोर आल्याने मुलगी खरं बोलत असल्यावर शिक्कामोर्तब झाले आणि नराधम बापाचे किळसवाणे कृत्य समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.